AI मुळे 2027 मध्ये कोरोनापेक्षाही मोठं संकट ? संशोधकाचा गंभीर इशारा

AI : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक कामं सोपी आणि वेगवान झाली आहेत. अवघ्या काही सेकंदांत तासन्तास लागणारी कामं पूर्ण होत आहेत. मात्र, AI च्या वाढत्या वापरामुळे नव्या धोक्यांचीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच AI संशोधक निकोला जुर्कोविच यांनी २०२७ मध्ये मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या कुटुंबीयांना किमान दोन आठवडे पुरेल इतके अन्न, पाणी आणि रोख रक्कम घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.



सोशल मीडियावर शेअर केलं खुलं पत्र


निकोला जुर्कोविच हे METR या ना-नफा संस्थेशी संबंधित तांत्रिक कर्मचारी आहेत. ही संस्था प्रगत AI प्रणालींमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा अभ्यास करते. निकोला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक खुलं पत्र शेअर केलं आहे. या पत्रात त्यांनी AI च्या वेगाने वाढणाऱ्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून या विषयाची काळजी वाटत असून, आता याबाबत लोकांशी उघडपणे बोलण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



२०२७ मध्ये मानवी जीवनालाही धोका ?


निकोला यांनी पत्रात म्हटलं आहे की, भविष्यात आपण पुढचं वर्ष पाहू शकू की नाही, याबाबत पहिल्यांदाच त्यांना शंका वाटत आहे. त्यांच्या मते, AI प्रणालींच्या वाढत्या क्षमतेमुळे सायबर हल्ले आणि डेटा चोरीसारखे धोके अधिक गंभीर होऊ शकतात. आतापर्यंत अशा घटनांमुळे प्रामुख्याने आर्थिक नुकसान झालं असलं, तरी भविष्यात याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.






AI मुळे निर्माण होऊ शकतात हे तीन मोठे धोके


निकोला यांनी AI मुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या तीन प्रमुख धोक्यांकडे लक्ष वेधलं आहे.


महत्त्वाच्या यंत्रणांवर सायबर हल्ले: AI चा वापर करून एखाद्या देशाच्या महत्त्वपूर्ण डिजिटल आणि पायाभूत यंत्रणांमध्ये घुसखोरी केली जाऊ शकते.


जैविक शस्त्रांचा धोका: एखादी व्यक्ती AI च्या मदतीने जैविक शस्त्रं विकसित करण्याचा प्रयत्न करू शकते.


यंत्रांच्या हाती वाढती सत्ता: जागतिक नेते AI प्रणालींवर अतिप्रमाणात अवलंबून राहिल्यास निर्णय प्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.



घरात अन्न, पाणी आणि रोख रक्कम ठेवण्याचा सल्ला


संभाव्य धोक्यांचा विचार करून निकोला यांनी आपल्या कुटुंबीयांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. घरात किमान दोन आठवडे पुरेल इतकं अन्न आणि पिण्याचं पाणी साठवून ठेवण्यास त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय काही रोख रक्कमही जवळ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात सायबर हल्ल्यांमुळे ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल आर्थिक सेवांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, २०२७ मध्ये कोविड-१९ महामारीपेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा निकोला यांनी केला आहे. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक अंदाज आणि संभाव्य धोक्यांबाबतचा इशारा आहे.

Comments
Add Comment

Accident News : लग्नाहून परतताना काळाचा घाला ! कारचा भीषण अपघात, पती-पत्नी ठार

Accident News  : उत्तर प्रदेशातील बलरामपूर-बहराइच मार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला

Rule Change 1st December: LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत...! 1 डिसेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम; थेट तुमचा खिशावर परिणाम

नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या

Women Reservation : 2029 च्या निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू होणार ? केंद्र सरकारची तयारी ; पंतप्रधान मोदी म्हणाले, महिलांना दिलेला शब्द पूर्ण करणार

नवी दिल्ली : देशातील महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holiday December 2026 : जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी

Indian Railways News: ट्रेनचे जुने डबे आता भंगारात नाही, तर रेस्टॉरंटमध्ये! रेल्वेची कमाईची अनोखी शक्कल

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा