
मुंबई (विशेष् प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयासमोर ७५ फूट उंचीवर भव्य राष्ट्रध्वज कायमस्वरूपी उभारण्यात यावा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या मुख्यालयासमोर डौलाने फडकणारा तिरंगा हा प्रत्येक मुंबईकरासाठी राष्ट्रीय अभिमानाचा विषय ठरेल असे या पत्रात नमुद केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. अशा ठिकाणी भव्य राष्ट्रध्वज उभारल्यास मुख्यालयाच्या सौंदर्यात आणि वास्तूच्या गौरवात भर पडेल. तसेच हे ठिकाण पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनेल. हेरिटेज वास्तूशी संबंधित सर्व नियम, निकष आणि भारतीय ध्वज संहितेचे काटेकोर पालन करून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात किंवा समोरील योग्य जागेवर ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी उभारण्याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC : उबाठाच्या पक्षतोड, वृक्षतोडच्या आरोपांचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी घेत मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामासाठी ...
मुंबई महापालिका मुख्यालय ही केवळ प्रशासकीय इमारत नसून मुंबईची ऐतिहासिक ओळख असलेली आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीतील एक महत्त्वपूर्ण वास्तू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या मुख्यालयासमोर डौलाने फडकणारा तिरंगा हा प्रत्येक मुंबईकरासाठी राष्ट्रीय अभिमानाचा विषय ठरेल. तसेच महापालिकेत येणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असे खणकर यांनी पत्रात नमूद केले आहे.





