कन्फर्म रेल्वे तिकीट वाया जाणार नाही! ऐनवेळी दुसर्‍याच्या नावावर असा करा बदल; जाणून घ्या...

जर आता तुमचा प्रवास रद्द झाल्यावर कन्फर्म रेल्वे तिकीट वाया जाण्याची चिंता आता जाणार आहे. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार कुटुंबातील सदस्य, विद्यार्थी किंवा प्रवासी गटासाठी तिकिटावरील नाव बदलता येणार आहे. तिकिटातील नावामध्ये बदल करण्यासाठी वेळ आणि आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे? जाणून घेऊया...

मुंबई: रेल्वे प्रवासाचे नियोजन केल्यानंतर अचानक काही अडचण आल्यावर अनेकदा कन्फर्म तिकीट झालेलं तिकिट आपल्याला रद्द करावे लागते किंवा ते वाया जाणार म्हणून आपल्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण प्रवाशांनो आता टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुमचं प्रवास करणं रद्द झालं असेल आणि तुम्हाला तुमचं तिकिट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करायचं असेल, तर ते तुम्ही आता सहज करू शकणार आहेत. मूळ प्रवाशाला प्रवास करणे शक्य नसल्यास त्याच्या ऐवजी दुसरा व्यक्ती व्यक्ती त्याच तिकिटावर प्रवास करू शकणार आहे. भारतीय रेल्वेचीही सुविधा एक अत्यंत उपयुक्त सुविधा फायदेशीर ठरू शकणार आहे.


दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर तिकिट ट्रान्सफर करण्यासाठी रेल्वेकडून काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार, कन्फर्म तिकीट केवळ जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर करता येणार आहे. यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांचा समावेश आहे. पण, प्रवास करणे शक्य नसल्यास प्रवासी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊ शकतात. तुमच्या तिकिटावरील नाव बदलण्यासाठी प्रवाशाला रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयात जाऊन लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या किमान 24 तास आधी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत मूळ प्रवासी आणि ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे, त्या दोघांचे अधिकृत ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहे.



कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कोणाला मिळू शकतो या सुविधेचा लाभ?



  • विद्यार्थी: शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांच्या लेखी परवानगीने एका विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव तिकिटावर टाकता येणार आहे. यासाठी गाडी सुटण्याच्या किमान 48 तास आधी अर्ज करावा लागेल.

  • लग्नाचा किंवा एकत्र प्रवास करणारा गट: लग्नासाठी किंवा अन्य कारणामुळे एकत्र प्रवास करणाऱ्या ग्रुपमधील एखाद्या व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नाव घ्यायचे असल्यास समूहाच्या प्रमुखाला किमान 48 तास आधी अर्ज करता येणार आहे.

  • सरकारी कर्मचारी: शासकीय कामासाठी प्रवास करायचा असल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याऐवजी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक झाल्यास, सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीने तिकिटावरील नाव बदलता येईल.


प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर हा पर्याय दिलासादायक ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासापूर्वी वेळेत अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे आणि रेल्वेच्या अटी तपासून घेणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 28 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 11 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर; गरजू रुग्णांना मिळणार नवा आधार

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, या उद्देशाने काम करणाऱ्या मुख्यमंत्री सहायता

सहकारी साखर कारखान्यांच्या 'शासकीय कर्ज हमी'ला लगाम; 100 कोटींची मर्यादा

मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनाच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यांना दिल्या