संगणकापलीकडचा AI! स्वतः निर्णय घेणाऱ्या मशीन बनवण्यासाठी भारतीय स्टार्टअप सज्ज
नवी दिल्ली येथील 'लक्ष्य एरो टेक' हा स्टार्टअप अशाच तंत्रज्ञानावर काम करत आहे. लोकेश पोपुरी यांच्या स्टार्टअपला समाख्या ग्रुपचे प्रवर्तक संतोष कुमार ...
काही सोशल मीडिया युजर्सने दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या मागील बाजूस मॅट फिनिश आणि स्क्वेअर कॅमेरा आयलँड दिसत आहे. कॅमेरा सेटिंगमध्ये दोन लांब कटआउट आणि त्याखाली LED फ्लॅश देण्यात आला आहे. ह्या फोनचा लूक काहीसा अलीकडच्या OnePlus च्या फोनसारखा दिसत आहे. डिस्प्लेच्या बाजुला मध्यभागी पंच- होल सेल्फी कॅमेरा दिसत आगहे. अर्थात, हे सुरुवातीचे लिक फोटो असल्यामुळे प्रत्यक्ष लाँचच्या वेळी रचनेत काही बदल होण्याची शक्यता आहे. मोबाईल युजर्सना सर्वाधिक उत्सुकता आहे ती, मोबाईलच्या 10,000 mAh बॅटरीची. सध्या अनेक स्मार्टफोन्समध्ये 5000 mAh ते 7000 mAh पर्यंतची बॅटरी आहे. Realme 16 Pro मध्ये 7000 mAh बॅटरी होती, त्यामुळे नवीन मॉडेलमध्ये सुमारे 43 टक्क्यांनी अधिक बॅटरी क्षमता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, बॅटरी मोठी असली तरी ती प्रत्यक्षात किती दिवस टिकेल, हे स्क्रीन ब्राइटनेस, गेमिंग, इंटरनेट वापर, कॅमेरा आणि बॅकग्राउंड अॅप्सवर अवलंबून राहील. बॅटरी क्षमता वाढत असली, तरी चार्जिंगच्या वेगाबाबत मात्र निराशा होऊ शकते. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, Realme 17 Pro ला ६५W फास्ट चार्जिंग मिळू शकते, तर Realme 16 Pro मध्ये 80 W चार्जिंगचा पर्याय होता. त्यामुळे 10,000 mAh बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास किती वेळ लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुसरीकडे, फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले आणि 4 nm तंत्रज्ञानावर आधारित MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे. 144 Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे, युजर्सला कोणते प्रोसेसर मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आता AI स्वतःहून करणार तुमची कामं ! फोन-लॅपटॉप बंद असतानाही Claude Duet राहणार अॅक्टिव्ह
समजा, तुम्ही ऑफिसच्या कामातून ब्रेक घेतला आहे, बाहेर फिरायला गेला आहात किंवा तुमचा फोन आणि लॅपटॉपही बंद आहे... पण तरीही तुमची महत्त्वाची कामं सुरूच आहेत! ...
कॅमेरामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. कथित माहितीनुसार, या फोनमध्ये 32 MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. जो आधीच्या मॉडेलच्या 50 MP सेल्फी कॅमेऱ्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच कंपनीने बॅटरीवर भर देताना सेल्फी कॅमेऱ्यात कपात केल्याचे दिसते. रियर कॅमेऱ्याबाबत अद्याप ठोस माहिती नाही. Realme 16 Pro मध्ये 200 MP मुख्य कॅमेरा होता, पण तोच कॅमेरा पुढेही कायम राहील की नाही हे निश्चित नाही. कंपनीने अद्याप भारतातील लाँच तारीख किंवा किंमत जाहीर केलेली नाही. Realme 16 Pro जानेवारी 2026 मध्ये 31,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत लाँच झाला होता, तर नवीन मॉडेलच्या किमतीबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.