Man Ki Baat : 'मन की बात'च्या 140व्या भागातून PM नरेंद्र मोदींचा देशाला संदेश ! नशामुक्त भारतासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १४०व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांमधील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त करत नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, हरवलेले मोबाईल परत मिळवण्यासाठीचे डिजिटल व्यासपीठ, बिहारमधील संग्रहालय, भारताची आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रातील कामगिरी आणि उद्योजकतेच्या संधी अशा विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.



तरुणांच्या स्वप्नांसमोर नशेचे मोठे आव्हान


पंतप्रधान मोदी म्हणाले की, तरुणांच्या स्वप्नांच्या आड ड्रग्ज आणि नशा हे मोठे आव्हान बनले आहे. मात्र, देशात नशेविरोधात समाजाची सक्रियता वाढत असल्याचे समाधान आहे. ‘नशामुक्त युवा अभियान’ही वेगाने सुरू असून, या लढ्यात समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होण्याची गरज आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्यविकासासाठी सुरू असलेल्या ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. या व्यासपीठावर १७ भारतीय भाषांमध्ये ७ हजारांहून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घेतला आहे. काही कर्मचारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण घेत आहेत, तर काही इंडियन साइन लँग्वेज शिकत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.



हरवलेला मोबाईल मिळवण्यासाठी 'संचार साथी'ची मदत


हरवलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘संचार साथी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत होऊ शकते, असेही पंतप्रधानांनी सांगितले. या व्यासपीठामुळे नागरिकांना हरवलेल्या मोबाईलसंदर्भात आवश्यक मदत मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. (Man Ki Baat )






बिहार म्युझियमला जगात नववे स्थान


बिहारच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करताना मोदी यांनी पाटणा येथील बिहार म्युझियमच्या कामगिरीचे कौतुक केले. जगातील १०० सर्वोत्तम संग्रहालयांच्या यादीत बिहार म्युझियमला नववे स्थान मिळाले असून, संपूर्ण आशियात या संग्रहालयाने प्रथम क्रमांक पटकावल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच गुजरातमधील वडनगर येथील ‘अनंत अनादि वडनगर पुरातत्त्व-संबंधी प्रयोगात्मक संग्रहालया’चाही त्यांनी उल्लेख केला. वडनगरमध्ये उत्खननादरम्यान इतिहासाच्या विविध कालखंडांतील अनेक महत्त्वपूर्ण वस्तू सापडल्या. याच उत्खननस्थळी संग्रहालय विकसित करण्यात आले आहे.



व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताच्या पॅव्हेलियनचा गौरव


आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रातील भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी इटलीतील व्हेनिस येथे आयोजित ‘व्हेनिस आर्ट बिएनाले’ या प्रतिष्ठित कला प्रदर्शनाचा उल्लेख केला. कला विश्वातील ऑलिम्पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात भारताच्या पॅव्हेलियनला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे साडेचार लाख लोकांनी भारताच्या पॅव्हेलियनला भेट दिली. विशेष म्हणजे, जगभरातून आलेल्या प्रेक्षकांनी मतदानाद्वारे भारताच्या पॅव्हेलियनची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केल्याचे मोदी यांनी सांगितले.






चॉकलेट उद्योगातून उद्योजकतेला नवी संधी


देशातील चॉकलेट उद्योगातही नवनवीन प्रयोग होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. विविध भागांतील उद्योजक स्थानिक सामग्रीचा वापर करून चॉकलेटचे नवे फ्लेवर्स तयार करत आहेत. अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून, यामुळे शेतकरी, महिला आणि तरुण उद्योजकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.



कॅनडातील 'साई धाम फूड बँक'चा उल्लेख


समाजसेवेच्या उपक्रमांविषयी बोलताना मोदी यांनी कॅनडातील ‘साई धाम फूड बँक’ या संस्थेचा उल्लेख केला. कोणालाही उपाशी झोपू द्यायचे नाही, हे या संस्थेचे ध्येय आहे. जगभरात सुरू असलेल्या अशा सेवाभावी उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते, असे त्यांनी सांगितले.



चित्रकार शोभा सिंह यांची आज १२५वी जयंती


यावेळी पंतप्रधानांनी महान चित्रकार शोभा सिंह यांचेही स्मरण केले. शीख गुरूंची अप्रतिम चित्रे साकारणारे शोभा सिंह यांची आज, २९ नोव्हेंबर रोजी १२५वी जयंती आहे. त्यांच्या कलेचा उल्लेख करत मोदी यांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन केले.‘मन की बात’च्या या भागातून पंतप्रधानांनी सामाजिक जागरूकता, कौशल्यविकास, सांस्कृतिक वारसा, उद्योजकता आणि सेवाभाव अशा विविध विषयांवर देशवासीयांचे लक्ष वेधले.

Comments
Add Comment

Medicare Rules : अमेरिकेत 3 लाख कायदेशीर स्थलांतरितांना मोठा धक्का ! ट्रम्प सरकारचा मेडिकेअरबाबत नवा नियम

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने मेडिकेअर या सरकारी आरोग्य विमा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले ! एकीकडे नागरिकांचा मृत्यू, तर दुसरीकडे तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन हल्ल्यांची

देव दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला! रांची- पटना महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; 4 चिमुकल्यांसह 13 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई: झारखंडमधील रामगड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. रांची-पटना

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 25 वा हप्ता कधी येणार? फेब्रुवारी महिन्याबाबत महत्त्वाची अपडेट

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman

सोमवारी लोकसभेत काय होणार? कोणते विधेयक मांडले जाणार, समोर आली संपूर्ण यादी

मुंबई: सोमवारी, 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा कामकाजाचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे. देशात

EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे