EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी त्यांच्या पीएफ खात्यातून अधिक रक्कम काढता येणार आहे. तर काही विशिष्ट अटींनुसार, तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत खात्यात कोणतीही रक्कम जमा न करताही व्याज जमा होत राहते.

सध्या पीएफ खात्यात किमान 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. मात्र, आता ही मर्यादा 25 टक्क्यांवरून थेट 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफमधील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. अनेकदा, नोकरी बदलल्यानंतर, परदेशात स्थायिक झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यानंतर, लोक त्यांच्या जुन्या पीएफ खात्यांबद्दल विसरून जातात. त्यामुळे नोकरदार वर्गाला सतत ही भीती असते की जर तीन वर्षांपर्यंत खात्यात नवीन पैसे जमा केले नाहीत, तर व्याज जमा होणे थांबेल का? जर तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल, तर ईपीएफओने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वीच, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) एका यूट्यूब व्हिडिओद्वारे स्पष्ट केले की, केवळ योगदान थांबल्यामुळे खाते लगेच बंद होत नाही.

जुन्या खात्यावर किती काळ व्याज दार मिळणार?


ईपीएफ योजना 1952 च्या कलम 72(6) नुसार, तीन वर्षांचा नियम प्रत्येक कर्मचाऱ्याला समान लागू होतो असा नाही. जर एखादा कर्मचारी वयाच्या 55 ​​वर्षांपूर्वी नोकरी सोडत असेल, त्यानंतर जर त्याने नवीन योगदान दिले नसले तरीही, त्याच्या जुन्या पीएफ खात्यात वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याजदर जमा होत राहते. जे कर्मचारी वयाच्या 55 ​​व्या वर्षी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होतात, त्यांच्यासाठी शेवटच्या योगदानापासून ३६ महिन्यांचा (तीन वर्षांचा) कालावधी असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी जर पैसे काढले नाहीत तर त्यांना वयाच्या 61 वर्षांपर्यंत व्याज मिळेल. यानंतर, खाते निष्क्रिय होते आणि व्याज जमा होणे थांबते.

खाते निष्क्रिय कधी होते?


1 खातेधारक जर 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयात सेवानिवृत्त झाला असेल आणि 36 महिन्यांपर्यंत निधी काढला नाही.

2. खातेधारक कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाला असेल, त्यानंतर 36 महिन्यांपर्यंत खात्यात त्याने कोणतेही योगदान दिले नसेल.

3. खातेधारकाच्या मृत्यूनंतर 36 महिन्यांच्या आत नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसाने दावा केला नाही.

4. चुकीच्या किंवा बंद बँक खात्यामुळे अंतिम सेटलमेंटची रक्कम परत केली गेली, ज्यानंतर 36 महिन्यांपर्यंत कोणताही दावा केला गेला नाही.

बंद खात्यातून पैसे काढण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज


जर खाते निष्क्रिय झाले म्हणजे तुमचे कष्टाचे पैसे गेले असं होत नाही. नागरिक नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस आवश्यक पडताळणी पूर्ण करून त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळवू शकतात. यासाठी विशिष्ट परिस्थितीनुसार वेगवेगळे अर्ज तुम्हाला भरावे लागणार. त्यामुळे संपूर्ण रक्कम काढण्यासाठी अर्ज 19, जुनी पीएफ शिल्लक नवीन खात्यात हस्तांतरित करण्यासाठी अर्ज 13, आणि नामनिर्देशित व्यक्तीला मृत सदस्याच्या पैशांवर दावा करण्यासाठी अर्ज 20 आवश्यक आहे.

निष्क्रिय खाते सक्रिय कसे करणार?


सर्वप्रथम तुमचा UAN सक्रिय आहे की नाही हे चेक करा. ते पाहण्यासाठी EPFO ​​सदस्य पोर्टल किंवा उमंग ॲपवर तपासा. त्यानंतर, तुमचे KYC अद्ययावत करा. यामध्ये तुमचा आधार, पॅन, बँक खात्याचा तपशील आणि देशाबाहेर जाण्याच्या तारखा यांचा समावेश करा. जर तुमच्याकडे UAN नसेल किंवा सुरक्षेच्या कारणास्तव तुमचे खाते ब्लॉक केले असेल, तर तुम्ही तुमची ओळख पडताळण्यासाठी EPFO ​​क्षेत्रीय कार्यालयाला किंवा "निधी आपके पास 2.0" शिबिराला भेट देऊ शकता.
Comments
Add Comment

लखनऊमध्ये 1 ते 10 डिसेंबरदरम्यान भव्य 'यूपी कोऑपरेटिव्ह एक्स्पो- 2026' चे आयोजन

उत्तर प्रदेशचे सहकार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जे.पी.एस. राठौर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी राजधानी

AI मुळे 2027 मध्ये कोरोनापेक्षाही मोठं संकट ? संशोधकाचा गंभीर इशारा

AI : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक कामं सोपी आणि वेगवान झाली आहेत. अवघ्या काही सेकंदांत तासन्तास लागणारी कामं

Accident News : लग्नाहून परतताना काळाचा घाला ! कारचा भीषण अपघात, पती-पत्नी ठार

Accident News  : उत्तर प्रदेशातील बलरामपूर-बहराइच मार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला

Rule Change 1st December: LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत...! 1 डिसेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम; थेट तुमचा खिशावर परिणाम

नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या

Women Reservation : 2029 च्या निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू होणार ? केंद्र सरकारची तयारी ; पंतप्रधान मोदी म्हणाले, महिलांना दिलेला शब्द पूर्ण करणार

नवी दिल्ली : देशातील महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holiday December 2026 : जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी