Home टॉप स्टोरी अंजली दमानिया यांचा ‘आप’चा राजीनामा

अंजली दमानिया यांचा ‘आप’चा राजीनामा

1

आम आदमी पक्षाच्या नेत्या (आप) अंजली दमानिया यांनी पक्ष नेतृत्वावर घोडेबाजार करत असल्याची टीका करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
मुंबई- आम आदमी पक्षाच्या नेत्या (आप) अंजली दमानिया यांनी पक्ष नेतृत्वावर घोडेबाजार करत असल्याची टीका करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन याबाबत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती दिली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विटरवर ‘आय क्विट’ असा संदेश लिहिला आहे. मी अशा मुर्खपणासाठी ‘आप’मध्ये आले नव्हते. मी अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना तत्त्वांसाठी पाठिंबा दिला, घोडेबाजार करण्यासाठी नाही, असेही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

आपमध्ये प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या हकालपट्टीवरुन सध्या वाद सुरु आहे. ‘आप’चे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनी भूषण आणि यादवांच्या राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टीला केजरीवाल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आता अंजली दमानिया यांनीही थेट पक्ष नेतृत्वावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

केजरीवाल यांच्यावर झालेल्या आरोपांची ४८ तासांत चौकशी करून सत्य काय आहे ते पुढे आणावे अशी मी मागणी करीत आहे. मी हे पक्षासाठी नाही तर या देशासाठी म्हणत असल्याचे दमानिया यांनी ट्विटवर म्हटले आहे.

गेल्यावर्षी अंजली दमानिया यांनी ‘आप’मधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.

दरम्यान, दमानिया यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच आपचे आमदार राजेश गर्ग यांनीही केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप केला.

अरविंद केजरीवाल काँग्रेसला फोडण्याचे राजकारण करत असल्याच्या एका ऑडियो रेकॉर्डिंगने सध्या खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मोबाईलमधले हे रेकॉर्डिंग राजेश गर्ग या आम आदमी पार्टीच्या माजी आमदाराशी झाले असून त्यांनी हे रेकॉर्डिंग खरे असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यात आणि अन्य पक्षांच्या नेत्यांमध्ये काय फरक आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर दिल्लीमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी केजरीवाल यांनी जुळवाजुळव सुरू केली होती. त्यावेळी, केजरीवाल यांनी काँग्रेसचे सहा आमदार फोडायला सांगितले होते. तसेच केजरीवाल यांनी यामध्ये तीन आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते भाजपाला पाठिंबा देणार नाहीत असे सांगितल्याचे ऐकायला येत आहे. त्यामुळे तीन मुस्लीम आमदारांना काँग्रेसमधून फोडले तर ते आपला पाठिंबा देतील, असे स्पष्ट धार्मिक राजकारण करत आपण यातही तसूभर मागे नसल्याचे केजरीवाल यांनी दाखवून दिले आहे.

 

 

1 COMMENT

  1. राजा एक असतो pradhan एक asato senapati एक असतो खजिनदार एक असतो.sardar आनेय्क असतात.pratekane आपली कामे करायची असतात.दुसरायचा कामात दखल द्यायची नसतात हे ज्यांना समजत नाही.आशांना अंजली दमानिया म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version