Home टॉप स्टोरी अडवाणी यांच्यासारखी माझी अवस्था

अडवाणी यांच्यासारखी माझी अवस्था

1

सध्या पक्षात नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावे असे चित्र असल्याचा खोचक टोला लगावतानाच, भाजपमध्ये सध्या माझी अवस्था भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे.

जळगाव –  सध्या पक्षात नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावे असे चित्र असल्याचा खोचक टोला लगावतानाच, भाजपमध्ये सध्या माझी अवस्था भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे, अशी सल माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्हा भाजपच्या संघटनेच्या बैठकीत खडसेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मनातील वेदनाही बोलून दाखविली. इतकी वर्षे आपण पक्षासाठी मेहनतीने कार्य केले. अडवाणींची परिस्थितीही तीच आहे. आयुष्यभर त्यांनीही मेहनत केली, आता नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावे असे चित्र असल्याचे वक्तव्य खडसेंनी केले. या बैठकीत खडसेंचे पुनर्वसन करण्याचा ठराव करावा, यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

महाजन यांची नाराजी
खडसेंच्या पुनरागमनावरून त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. ते यावेत, हे जसे प्रत्येकाला वाटते, तसे आम्हालाही वाटते, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. योग्य वेळी ते येतीलच, मात्र त्यासाठी घोषणाबाजी करून गोंधळ घालणे योग्य नसल्याचे मत महाजनांनी व्यक्त केले. दिवसेंदिवस मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे भाजपची जोमाने वाढ होत आहे, आगामी काळात राज्यातील अनेक मोठे दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

1 COMMENT

  1. नाथाभाऊ शिवसेनेशी युती तोडणारे तुम्हीच होता ना? पाहिलात आता काय वेळ आलीय तुमच्यावर, सत्तेचा गर्व चांगला नाही भाऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version