Home महामुंबई अपंगांना नव्याने नोंदणी करावी लागणार

अपंगांना नव्याने नोंदणी करावी लागणार

2

अपंगांची वारंवार होणारी नोंदणी रोखण्यासाठी आता राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाने नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

मुंबई – अपंगांची वारंवार होणारी नोंदणी रोखण्यासाठी आता राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाने नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या नवीन सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करताना वैद्यकीय अधिकारी अपंग व्यक्तीची तपासणी करून त्याला प्रमाणपत्र देतील. या प्रमाणपत्राला बारकोड पद्धत आणि यूआयडीचीही जोड देण्यात येईल, असे आयुक्त बाजीराव जाधव यांनी सांगितले.

अपंगांच्या कल्याणासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अनेकदा अपंग असल्याचे बोगस प्रमाण तयार करून सरकारची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयाने आता एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने अपंगांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

या पूर्वी अपंगांना नोंदणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी सकाळी बोलावले जात असत. मात्र, तेथील गर्दीचा गैरफायदा दलाल घेत असत. ग्रामीण भागांतील वैद्यकीय अधिका-यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने दलालच बोगस सही, शिक्के मारून प्रमाणपत्र देत असत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. याची दखल घेऊन अपंग कल्याण आयुक्तालयाने अपंगांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या सॉफ्टवेअरमुळे आता अपंग व्यक्तीची एकदाच नोंदणी होणार आहे. त्यामुळे एका अपंग व्यक्तीला दुस-या जिल्ह्यात जाऊन नोंदणी करता येणार नाही, असे जाधव यांनी सांगितले. तसेच पूर्वी ज्या अपंगांनी प्रमाणपत्र घेतले आहे, अशांना पुन्हा नोंदणी करणे सक्तीचे असेल. या सॉफ्टवेअरमध्ये अपंगांचा संपूर्ण डेटा जमा होणार आहे. परिणामी अपंगांची राज्यातील नेमकी संख्या किती आहे, हे देखील शोधणे शक्य होणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

राज्यात अपंगांची पाहणी
राज्यात नेमके किती अपंग आहेत, ते कोणत्या प्रकारात मोडतात, याचे सर्वेक्षण केले जात आहे. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड, रायगड, नंदूरबार या जिल्ह्यांत सर्वेक्षण सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने हे सर्वत्र करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन महिन्यांत सरकारकडे सादर करण्यात येईल, असे माहीतगारांनी सांगितले.

2 COMMENTS

  1. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अपग कर्मचा-याना आता पर्यत अँक्टीव्हा गाडी देणेत आलेली नाही. तरी साहेब क्रुपया लक्ष घालावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version