Home संपादकीय तात्पर्य अपघातांची दुर्दैवी मालिका

अपघातांची दुर्दैवी मालिका

1
संग्रहीत छायाचित्र

मुंबई आणि ठाणे जिल्हयाच्या आसपास गेल्या तीन-चार महिन्यात अनेक भीषण अपघात झाले आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग तर मृत्यूचा सापळा वाटावा, इतके अपघात या राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत आणि सातत्याने होत आहेत.

संग्रहीत

मुंबई आणि ठाणे जिल्हयाच्या आसपास गेल्या तीन-चार महिन्यात अनेक भीषण अपघात झाले आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग तर मृत्यूचा सापळा वाटावा, इतके अपघात या राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत आणि सातत्याने होत आहेत. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हयातल्या खेड जवळील दाभीळ पाझर तलाव येथे एका क्वालिस गाडीची वाळूची वाहतूक करणा-या डंपरशी धडक होऊन एकाच कुटुंबातले ११ जण जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले. मालाड येथील अनंत चव्हाण हे गोळवली टप्पा या गावी गेले होते. ते आपल्या मुलासाठी मुलगी बघायला गेले होते. पण मुलगी बघून परतत असताना त्यांच्या गाडीला खेडजवळ अपघात होऊन पूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले. ज्या मुलासाठी मुलगी पाहिली होती तो मुलगा, अनंत चव्हाण यांची पत्नी, ते स्वत:, त्यांचे जवळचे माने दांपत्य, दोन लहान मुले, तीन महिला असे सर्व जण प्राणाला मुकले तर त्याचा जावई रमेश होळकर आणि अभिषेक भुवड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे या परिसरातल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. कारण अलीकडच्या काळात या महामार्गावर सातत्याने लहान मोठे अपघात व्हायला लागले आहेत. गेल्या मार्चमध्ये या महामार्गावर यापेक्षा भीषण अपघात झाला होता. गोव्याकडून मुंबईला जात असलेल्या एका खासगी आराम बसला याच रत्नागिरी जिल्हयात अपघात झाला होता. त्यात ३७ प्रवासी ठार तर १५ जण जखमी झाले होते. रत्नागिरी जिल्हयाच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरच्या एका पुलावरून ही आराम बस नदीच्या पात्रात कोसळली होती. ठार झालेल्या ३७ जणांमध्ये पाच रशियन पर्यटक होते. या अपघाताची खूप चर्चा झाली. विशेषत: गोवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटन स्थळ आहे आणि गोव्याकडे जगभरातले लोक येत असतात. हे लोक विमानाने आधी मुंबईला येतात आणि मुंबई-ते गोवा असा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या महामार्गावरून ते पर्यटनासाठी गोव्याला जातात. सध्या देशातील अनेक महामार्गाचे रुंदीकरण करून ते मार्ग चारपदरी किंवा सहापदरी केले जात आहेत. परंतु मुंबई-गोवा हा महामार्ग ब-याच वर्षापासून आहे, तसाच आहे. महामार्गावरची काही ठराविक ठिकाणे तर कायम अपघातप्रवण म्हणून ओळखली जातात. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या मार्गाच्या रुंदीकरणाबाबतीत म्हणावे तेवढे जागरुक नाही. आता सध्या त्याच्या रुंदीकरणाची योजना असल्याचे सांगितले जात आहे. परंतु हे रुंदीकरण होण्यास २०१६ साल उगवणार आहे. खरे म्हणजे गोव्याचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व काही नवीन नाही. दीर्घकाळापासून गोवा हे देशातलेच नव्हे तर जगातले एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. असे पर्यटन स्थळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सरकारने प्राधान्याने, तातडीने करायला हवे होते. सोमवारचा अपघात दापोली तालुक्यात झाला. ३४ वर्षापूर्वी या तालुक्यातील पालगड धुंडी येथे चालती बस पेटल्यामुळे ३८ जण जळून मरण पावले होते. त्यानंतर हा मोठा अपघात झाला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version