Home महामुंबई ठाणे अमेरिकन तंत्रज्ञानाने ठाण्यातील खड्डे भरणार

अमेरिकन तंत्रज्ञानाने ठाण्यातील खड्डे भरणार

0

ठाणे महापालिकेचा देशातील पहिला प्रयोग

ठाणे – शहरातील खड्डे भरण्यासाठी पहिल्यांदाच अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. गुरुवारी अमेरिकन कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेऊन या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. यामध्ये विल्फ्रेड जो, क्रिस जिगलर, डेव्हिड लाईटफूट, तसेच पीजीके इंटरनॅशनल या कंपनीचे गुल कृपलानी आदींचा समावेश होता. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात पहिल्यांदा खड्डे भरण्यात येणार आहेत.

सुरुवातीला माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक, नागरी संशोधन केंद्र रोड या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर खड्डे भरण्यात येणार आहेत. त्यानंतर भविष्यात रस्ते बांधण्यासाठी या रसायनाचा कसा वापर करता येईल, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

काय आहे वैशिष्टय़
खड्डे भरण्यासाठी अॅग्रीबाइंड नावाचे रसायन वापरले जाणार आहे. हे रसायन प्रामुख्याने अमेरिकेमध्ये रस्ते, सिमेंट काँक्रीटच्या मजबुतीसाठी, इरिगेशन चॅनल्स बनविण्यासाठी तसेच खड्डे भरण्यासाठी वापरले जाते. द्रव स्वरूपातील पॉलिशसदृश हे रसायन खडीमध्ये मिसळून रस्ते तसेच खड्डे भरण्यासाठी वापरल्यास कमीत कमी पाच वर्षापर्यंत रस्ते टिकू शकतात. सदरचे रसायन हे घातक, ज्वलनशील, स्फोटक नसून वापरण्यासाठी पर्यावरणाभिमुख आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version