Home देश मुंबईवर ‘प्रभू कृपा’ नाही

मुंबईवर ‘प्रभू कृपा’ नाही

0

मुंबईसह महाराष्ट्राला रेल्वे अर्थसंकल्पात मोठ्या अपेक्षा असताना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी निराशा केली आहे.

मुंबई- मराठमोळे, मुंबईकर आणि कोकणातील माणूस म्हणून सुरेश प्रभू यांच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांचीच प्रभू यांनी निराशा केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राला रेल्वे अर्थसंकल्पात मोठ्या अपेक्षा असताना गुरुवारी नवी दिल्ली येथे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुंबईला ठेंगाच मिळाला आहे.

मुंबईत दिवसेंदिवस वाढणा-या गर्दीची जाणीव असणा-या प्रभूंकडून रेल्वे अर्थसंकल्पात नवीन लोकलची घोषणा करण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात वातानुकुलित लोकल आणि मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-३ हे जुने प्रकल्प वगळता हाती नवीन काहीच लागले नाही. मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यात पनवेल ते कर्जत दुहेरीकरण , विरार ते डहाणू तिसरी व चौथी माíगका , ऐरोली ते कळवा एलिव्हेटेड मार्ग, विरार ते डहाणू मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका, पनवेल ते कर्जत साठ किमी मार्गाचे दुहेरीकरण मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत व हार्बर मार्गावरील शेवटचे स्थानक असलेल्या पनवेल मार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प तीनमध्ये केला आहे.

प्रहार कौल-

[poll id=”941″]

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ऐरोली ते कळवा  मार्गावर एलिव्हेटेड मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मेन लाईनला ट्रान्स हार्बर मार्ग जोडला जाईल. या मार्गामुळे ठाणे स्थानकातील गर्दी कमी करता येईल. मुंबईत रेल्वे अपघातांत दरवर्षी हजारो लोक मृत्यमुखी पडतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी फुट ओव्हर ब्रिज, एस्कलेटर आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

रेल्वेमंत्री सर्वच रेल्वे मंत्र्यांनी आपआपल्या राज्यांकडे विशेष लक्ष दिले होते. मात्र यावेळी महाराष्ट्राच्या वाटय़ाला रेल्वेमंत्रीपद आले असताना देखील नव्याने काहीच देण्यात आलेले नाही. रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत रेल्वेमंत्र्यांनी काढता पाय घेतला. याशिवाय रेल्वे मंत्र्यांनी केवळ सुविधांवर भर दिल्याने प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित व वेगवान होण्याची घोषणा करत उच्च वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केल्याची टीका होत आहे.

मुंबईला काय मिळाले?

» मुंबई लोकलच्या एमयूटीपी तीनची घोषणा, सहा नव्या प्रकल्पांचा समावेश

» लवकरच एसी लोकल धावणार

» पनवेल – कर्जत दुपदरीकरणासाठी एक हजार ५६१ कोटींची तरतूद

» विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे चौपदीकरण, त्यासाठी ३ हजार ५५५ कोटी

» मुंबई लोकलच्या कोचेससाठी ५६५ कोटींची तरतूद

» मुंबईतील रेल्वे स्थानकं विकसित करण्यावर भर देणार, स्थानकांच्या विकासाठी १ हजार ९५० कोटी

» ऐरोली – कळवा उन्नत मार्गासाठी ४२८ कोटी रुपयांची तरतूद

» मुंबई दिल्ली मार्गावरील रेल्वे प्रवासाचा वेग वाढवणार

» महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

» अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी ५२० कोटी

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version