Home महामुंबई अवघ्या चार सेकंदात १०० किलोमीटर!

अवघ्या चार सेकंदात १०० किलोमीटर!

1

अवघ्या ४.१ सेकंदात १०० किलोमीटरचा टप्पा गाठणारी ‘रेसिंग कार’ बनवण्याची भन्नाट कल्पना के. जे. सोमय्याच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सत्यात उतरवली आहे.

मुंबई- अवघ्या ४.१ सेकंदात १०० किलोमीटरचा टप्पा गाठणारी ‘रेसिंग कार’ बनवण्याची भन्नाट कल्पना के. जे. सोमय्याच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सत्यात उतरवली आहे. जर्मनी येथे होणा-या ‘फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी’ या रेसिंग स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘ओ. आर. आय. २०१३’ ही कार बनवली आहे.

६०० सीसी होंडा सी. बी. आर. इंजिन, लाइव्ह टेलिमेंटरी अर्थात कार सुरू असताना वेग आणि स्थितीविषयक माहिती देणारे हे बाह्य साधन आदी वैशिष्टय़ांसह केवळ ४.१ सेकंदात ही रेसिंग कार १०० किलोमीटरचा पल्ला गाठू शकते, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. मॅकेनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही रेसिंग कार बनवली आहे.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात ही कार बनवण्यास सुरुवात झाली. जून महिन्यात ही कार पूर्णत्वास आली असल्याचे सुर्हद पटवर्धन या विद्यार्थ्यांने सांगितले.
गेल्या सहा वर्षापासून या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे सोमय्या हे एकमेव महाविद्यालय असून, गेल्या वर्षी याच स्पर्धेत सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ४१वा क्रमांक आला होता.

जगभरातून सहभाग नोंदवणा-या महाविद्यालयांमधून पहिल्या ५०मध्ये येण्याचे कौशल्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखवल्याने यंदाही हे विद्यार्थी आपली कामगिरी पार पाडतील, असा विश्वास सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभा पंडित यांनी व्यक्त केला. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान होणा-या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुमारे वीस जणांचा जमू येत्या २२ जुलैला जर्मनीसाठी रवाना होणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version