Home टॉप स्टोरी आकाश टॅबलेट बाजारात दाखल

आकाश टॅबलेट बाजारात दाखल

1

‘आकाश २’ टॅबलेटचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी सादरीकरण केले. २९९९ रुपये किंमतीचा हा आकाश टॅबलेट विद्यार्थ्यांना  ११३२ रुपयांना मिळेल.

नवी दिल्ली- शिक्षण दिनाचे औचित्य साधून रविवारी ‘आकाश २’ टॅबलेट अपडेटेड व्हर्जनचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विज्ञान भवनात सादरीकरण करण्यात आले.

पहिल्या ‘आकाश’मध्ये दोष आढळल्यानंतर हा प्रकल्प सुधारित व्हर्जनसाठी आयआयटीमधील कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इंजिनिअरिंग विभागाकडे आला होता.

आकाशच्या या नव्या व्हर्जनमध्ये ओपन सोर्स ऍप्लिकेशन आणि कंटेंट वापर यांचाही समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना आकाश टॅबलेट सरकारकडून मिळणा-या अनुदानावर ११३२ रुपयांना मिळणार आहे. मात्र, या टॅबलेटची बाजारातील किंमत २९९९ रुपये असणार आहे. डिसेंबरपर्यंत एक लाख विद्यार्थ्यांना या टॅब्लेटचे वाटप करण्यात येईल, असा दावा आकाशची निर्मिती करणा-या डाटाविंड कंपनीने केला आहे.

याव्यतिरिक्त, बाजारात पाच हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत किंमतीचे टॅबलेटही उपलब्ध आहेत.

आकाश-2 ची खास वैशिष्‍टे…

टच पॅनेल- मल्‍टी टच प्रोजेक्टिव क्षमता

प्रोसेसर- कार्टेक्‍स

रॅम- ५१२ एमबी (आकाश-१ मध्‍ये २५६ एमबी होते)

ओएस अँड्राएड ४.०.३ ने संचलित

सेन्‍सर- जी सेन्‍सरने युक्‍त

बॅटरी-३००० एमएएच बॅटरी

कॅमेरा-व्हीजीए कॅमेरा

नेटवर्क- वायफाय

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version