Home मनोरंजन आमिरच्या हातात रेडिओही नाही

आमिरच्या हातात रेडिओही नाही

1

आमिर खानच्या आगामी ‘पीके’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवरुन वाद निर्माण झालेला असताना, आमिर येत्या २० ऑगस्टला ‘पीके’चे दुसरे पोस्टर रिलीज करणार आहे.

आमिर खानच्या आगामी ‘पीके’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवरुन वाद निर्माण झालेला असताना, आमिर येत्या २० ऑगस्टला ‘पीके’चे दुसरे पोस्टर रिलीज करणार आहे.

पहिल्या पोस्टरमध्ये माझ्या हातात रेडिओ तरी होता, मात्र दुस-या पोस्टरमध्ये हातात मी रेडिओही पकडलेला नाही असे आमिरने सांगितले. त्यामुळे आमिरचा दुसरा पोस्टर कसा असेल, अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडणार हा पोस्टर असेल का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

पीकेचा पहिलाच पोस्टर वादग्रस्त ठरला आहे. यामध्ये आमिर नग्न असून त्याने हातात रेडिओ पकडला आहे. पीकेचा पहिला पोस्टर प्रसिध्द झाल्यानंतर काही तासांच्या आतच कानपूरच्या एका वकिलाने या पोस्टर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.

सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. पीकेमध्ये आमिर भोजपूरी बोलताना दिसणार आहे. भोजपूरी भाषा शिकण्यासाठी दोन वर्ष प्रशिक्षण घेतल्याचे आमिरने सांगितले.

1 COMMENT

  1. अरे पेहलवान ! इतने मझबूत अगर मसल्स दिखा रहे हो ,तो “ओ “भी मसल दिखाना था ! उसको २ इन वन
    के पिछ्ये छूपानेकी क्या जरूरत थी ????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version