Home महाराष्ट्र कोकण आरक्षण अहवाल हे सर्वात मोठे यश

आरक्षण अहवाल हे सर्वात मोठे यश

1

माझ्या आयुष्यात आजवर जे यश मिळवले त्या कोणत्याही यशापेक्षा मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याचा परिपूर्ण अहवाल मी राज्य सरकारला देऊ शकलो, हे यश सर्वात मोठे आहे, असे मनोगत मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष, राज्याचे उद्योगमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. 
कणकवली– ‘मी मराठा समाजात जन्माला आलो. त्या कृतज्ञ भावनेतूनच समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न मराठा आरक्षण समितीचा अहवाल देऊन केला आहे. माझ्या आयुष्यात आजवर जे यश मिळवले त्या कोणत्याही यशापेक्षा मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याचा परिपूर्ण अहवाल मी राज्य सरकारला देऊ शकलो, हे यश सर्वात मोठे आहे, असे मनोगत मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष, राज्याचे उद्योगमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. जिल्ह्यातील मराठा बांधवांनी केलेल्या जोरदार स्वागतानंतर ते बोलत होते.

कणकवली येथील इंजिनीअरिंग कॉलेजच्या हेलिपॅडवर राणे यांचे हेलिकॉप्टर उतरल्यावर प्रचंड जनसमुदायाने त्यांच्या स्वागताच्या आणि अभिनंदनाच्या घोषणांचा एकच गजर केला. मराठा समाजातील गरीब, गरजूंना मदतीचा हात मिळण्यासाठी आणि आरक्षणाच्या माध्यमातून समाजाची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधण्यासाठी हे आरक्षण महत्त्वपूर्ण ठरेल.

महाराष्ट्र राज्य सरकार मराठयांना २० टक्के आरक्षण निश्चितपणे देईल, असा विश्वास राणे यांनी या वेळी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, राज्यातील समस्या सोडवण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या अनेक समित्यांवर मी अध्यक्ष आहे. मात्र, या समित्यांपैकी मराठयांना आरक्षण द्यावे, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मराठा आरक्षण समितीचा मी अध्यक्ष झालो, याचे मला मनस्वी समाधान वाटते. या संदर्भात ९०० पानांचा अहवाल आपण सरकारला दिला आहे. घटनेच्या १५व्या आणि १६व्या कलमांनुसार राज्यातील जो वर्ग सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया मागासलेला आहे, त्यांना आरक्षण देता येते. या घटनेच्या तरतुदीचा आधार घेत विकासापासून वंचित असलेल्या मराठा वर्गाला प्रगतीसाठी आरक्षणाचा हात दिला तर गरिबीतून बाहेर येऊन हा समाज कौटुंबिक स्थैर्य आणि आर्थिक उन्नती मिळवेल. मराठा समाजातील गरिबी दूर करण्यासाठी, दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि शिकल्यावर नोकरी मिळण्यासाठी हे आरक्षण महत्त्वपूर्ण ठरेल.

या आरक्षणाचा अहवाल देताना माझे सहकारी मंत्री, अधिकारी आणि कर्मचा-यांचे फार मोठे सहकार्य लाभले आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या विश्वासामुळेच हा अहवाल वेळेत देऊ शकलो. नऊ दिवसांत साडेअठरा लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. दिवसरात्र मेहनत घेऊन कर्मचा-यांनी अहवालासाठी माहिती घेतली. त्यामुळेच ख-या अर्थाने आरक्षणासाठीचा अहवाल वेळेत देण्याचे काम झाले. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, आरक्षण समितीवरील सहकारी सदस्य अशा प्रत्येकानेच माझ्या या अहवालाचे स्वागत केले. हे आरक्षण राज्य सरकार निश्चितपणे मराठा समाजाला देणार आहे. या मंत्रिमंडळात मी असल्याने या आरक्षणाबाबतची १०० टक्के हमी मी देतो, असे आश्वासनही या वेळी नारायण राणे यांनी दिले. समाजातील शेवटच्या घटकालाही प्रगतीकडे नेण्यासाठी हे आरक्षण आहे.
समाजातील ख-या अर्थाने मागासलेल्या घटकाला उभारी देण्यासाठी हे आरक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी घडवलेला इतिहास डोळयांसमोर ठेवून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, अखिल भारतीय मराठा समाज संघाचे एस. टी. सावंत, अ‍ॅड. उमेश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोटया सावंत, अशोक सावंत, युवक काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष दीपक सांडव, दादा परब, सुर्यकांत वारंग, बाप्पा फाटक, रमेश पालव आदींसह जिल्ह्यातील बहुसंख्य मराठा समाजबांधव उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या वतीने नारायण राणे यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. मराठा सेवा संघ, मराठा आरक्षण समिती, छावा आदी संघटनांच्या वतीनेही राणे यांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

नारायण राणे यांना मराठा समाजाचे भक्कम पाठबळ

मराठा आरक्षणाचा जो अहवाल आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला आहे, तो निश्चितच टिकेल आणि कायद्याच्या पातळीवर सक्षम ठरेल असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. या अहवालाबाबत नारायण राणे यांचे आभार मानताना ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मराठा ज्ञाती बांधव राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा समाज बांधवांची ताकद फार मोठी असल्याचे अ‍ॅड. उमेश सावंत यांनी सांगितले. जेव्हा मराठयांना आरक्षण मिळेल तेव्हा सिंधुदुर्गात एक लाखांपेक्षा जास्त मराठा समाजबांधव उपस्थित राहून नारायण राणे यांचे आभार मानतील, असे ते म्हणाले.

नारायण राणे यांनी राज्यभरातील मराठयांच्या अपेक्षा पूर्णत्वास नेल्या आहेत, असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एस. टी. सावंत यांनी सांगितले. जो अहवाल सादर केला तो दस्तऐवज बनला. गेले ३० वर्षात मराठा संघटनांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या मागणीची योग्य दखल घेऊन जाहीर केलेला अहवाल महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

1 COMMENT

  1. maharashtratil maratha samajatil aarthik drushtya magaslelya lokaana aarkshan milave yakarita maharashtra shasnane Ranesmiti stapan karun ahawal magvila. sadar ranesmitine maratha samajala aarkshan dyave aashi shifaras shasnala keli aahe tari shasnane yawar tatdine nirnay jahir karawa, shree narayan Ranejini (udyog mantri) yani yababat sakhol aabhyas karun jo aahawal shasanala dila, tyabaddal Chembur maratha samaj ya sansthe tarfe Manpurvak Dhanywad.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version