Home महामुंबई आरे कॉलनीतील ग्रीन झोन नो डेव्हलपमेंट झोनच

आरे कॉलनीतील ग्रीन झोन नो डेव्हलपमेंट झोनच

1

मुंबई महापालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा मंजूर केला आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा मंजूर केला आहे. मात्र या नव्या विकास आराखडय़ात एसआरए, थीम पार्क, क्रीडा संकुल उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या बाबींना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोध दर्शवला आहे.

आरे कॉलनी हा मुंबईतील एकमेव ग्रीन झोन आहे. हा पट्टा तसाच ठेवला पाहिजे. तेथे कोणत्याही पद्धतीच्या विकासकामांना मंजुरी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भागात होणा-या मेट्रोच्या आगाराला सरकारचा विरोध नसेल असेही त्यांनी सांगितले.

मात्र सरसकट कोणत्याही विकासकामांना या भागात मंजुरी मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा विकास आराखडा अजूनही सरकारला प्राप्त झालेला नाही. तो मिळाल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

  1. मुंबईतील कित्येक डोंगर फोडून तेथे विकासकांनी इमारतीच्या इमारती उभ्या केल्या, त्यामुळे पर्यावरण नष्ट होत गेले आणि वातावरणात जो ऑक्सिजन वायू मिळतो तो हि मिळण्यास मुबा राहिली नाही. मुंबई महापालिकेने खूप वर्षानंतर म्हणजे मुंबईच्या जनतेस वाटते जवळपास ७०टक्के डोंगराळ जागा नष्ट केल्या जेथे झाडे झुडप लावून वातावरणातील कार्बनडायऑक्साइड नष्ट करून ऑक्सिजन पुरवण्यास मदत होते. तरीही वसईविरार नगरपालिकेने पुष्कळ प्रमाणात बांधकाम करण्यास परवानगी दिली. जेथे अशा प्रकारची जमीन कधीच सापडत नाही, त्या सुपीक जमिनीस हि नापीक करून मुंबईची जवळपास विलेवाटच लावण्यात आली आहे. विकासकाला विकास करण्यास मुबा द्या परंतु ती मुबा खडकाळ, नापीक जमिनीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version