Home टॉप स्टोरी आर.के.लक्ष्मण अनंतात विलीन

आर.के.लक्ष्मण अनंतात विलीन

1

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’चे जनक आर. के. लक्ष्मण (रासिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण) हे मंगळवारी अनंतात विलीन झाले.  

पुणे – ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’चे जनक आर. के. लक्ष्मण (रासिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण) हे मंगळवारी अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी सरकारी इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता ९४ व्या वर्षी निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. फुप्फुस आणि किडनीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर होती. त्यांचे पार्थिव पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीष बापट, सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, चित्रकार रवी परांजपे, विनोद तावडे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.

व्यंगचित्रातून ‘कॉमन मॅन’ला जन्म देणारे व्यंगचित्रकार म्हणून लक्ष्मण यांची देशात ओळख आहे. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्याने, जनतेनेही ते उचलून धरले. त्यांची निरीक्षणशक्ती अतिशय तीव्र होती.

काही वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. पण तरीही त्यांनी ‘कॉमन मॅन’ रेखाटायचा सोडला नव्हता. आपल्या अचूक टिप्पणीतून व्यंगचित्रांमधल्या रेषांमधून त्यांनी नाते जोडले होते. सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे त्यांना अचूक भान होते. हे सगळे त्यांच्या कॉमन मॅनमधून व्यक्त होत होते.

कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला त्यांनी केलेले विधान पटायचे, म्हणूनच त्यांचा कॉमन मॅन लोकप्रिय ठरला आणि दीर्घकाळ सर्वाच्या स्मरणातही राहिला. विनोद, विडंबन, विरोधाभास तर कधी जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी या माध्यमातून मांडले. बोलक्या रेषा आणि त्यांची शैली ही अवर्णनीय होती. त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांचा राजकीय प्रवास रेखाटला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version