Home महामुंबई आवाजी मतदानाविरोधातील याचिका फेटाळल्या

आवाजी मतदानाविरोधातील याचिका फेटाळल्या

0

राज्यातील भाजप सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाद्वारे जिंकलेल्या विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणा-या याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.

मुंबई – राज्यातील भाजप सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाद्वारे जिंकलेल्या विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणा-या याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.

न्या.विद्यासागर कानडे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या. याप्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करुन इच्छित नसल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर या विरोधात काँग्रेसने रिट याचिका दाखल केली होती. तर संजय चिटणीस आणि राजकुमार यांनी या प्रकऱणी जनहित याचिका दाखल केली होती.

त्यासोबतच केतन तिरोडकर यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version