Home महाराष्ट्र कोकण आ. नितेश राणे यांचा मनमानी प्रशासनाला दणका

आ. नितेश राणे यांचा मनमानी प्रशासनाला दणका

0

चौपदरीकरण मोबदला न मिळाल्या प्रकरणी पार्वती पेडणेकर यांच्यावरील अन्याय केला दूर

कणकवली – मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण मोबदल्यातून डावलल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी कणकवली प्रांताधिका-यांना धारेवर धरतानाच पार्वती महादेव पेडणेकर आणि कुटुंबीयांवर अन्याय दूर केला.

महामार्ग चौपदरीकरण मोबदला डावलल्याच्या अन्यायाविरोधात पार्वती पेडणेकर आणि कुटुंबीयांनी कणकवली प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. या प्रकरणी लक्ष्मण अनंत पेडणेकर यांना ५६ लाख रुपयांचा मोबदला दिला गेला. हरकत घेऊनही हिस्सेदारांचा हक्क डावलल्याचा आरोप पार्वती पेडणेकर यांनी केला आहे.

आ. राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेताना कणकवली प्रांताधिकारी नीता सावंत यांना धारेवर धरले. ‘‘हरकत असताना एकाच व्यक्तीला कसा काय मोबदला दिला गेला, असा प्रश्न त्यांनी केला. हायवे नुकसानभरपाई देताना प्रांत कार्यालयातून भ्रष्टाचार होत असून हायवे प्रोजेक्टची अधिका-यांनी वाट लावली आहे. अधिकारी हे प्रकल्पग्रस्तांच्या टाळूवरील लोणी खाताहेत, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहे.

माझ्या मतदारसंघातील जनतेला वेठीस धरल्यास गप्प बसणार नाही, असा सज्जड दम देताच प्रांताधिका-यांनी नरमाईची भूमिका घेतली. ‘लक्ष्मण पेडणेकर यांना देण्यात आलेल्या ५६ लाख रुपयांची रिकव्हरी करू. तसेच पार्वती पेडणेकर आणि सह-हिस्सेदारांना मोबदला मिळवून देऊ, असे लेखी आश्वासन प्रांताधिका-यांनी दिले. लेखी आश्वासनानंतर आ. नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी प्रांताधिका-यांना घातलेला घेराव मागे घेतला. आ. राणे यांच्या दणक्यानंतर प्रांताधिका-यांनी लक्ष्मण पेडणेकर व त्यांच्या सहहिस्सेदारांची प्रांत कार्यालयात बैठक बोलावली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version