Home महामुंबई इमारत प्रस्ताव विभागाची ‘साफसफाई’!

इमारत प्रस्ताव विभागाची ‘साफसफाई’!

1

इमारत प्रस्ताव विभागातील कार्यकारी अभियंत्यासह ३ अभियंत्यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केल्यानंतर महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या विभागाची साफसफाई मोहीम हाती घेतली आहे.

मंबई – भायखळा येथील इमारत प्रस्ताव विभागातील कार्यकारी अभियंत्यासह ३ अभियंत्यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केल्यानंतर महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या विभागाची साफसफाई मोहीम हाती घेतली आहे.

इमारत प्रस्ताव विभागातील शहर विभागाचे उपप्रमुख अभियंता गजरगावकर यांच्यासह सहायक अभियंता मनोज केदारे, ए. जी. तांबेवाघ, एम. जी. बोरीकर, सी. डी. चौधरी आदी अभियंत्यांच्या बदल्या करत आयुक्तांनी विभागातील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

इमारत प्रस्ताव विभागातील अभियंत्यांच्या बदल्यानंतर ३ दुय्यम अभियंत्यांना या विभागात बढती देण्यात आली आहे. शहर विभागातील उपप्रमुख अभियंता या पदी जी. एस. मगर, पूर्व उपनगरकरता यू. एस. अवसरे, पश्चिम उपनगरातील कांदिवली कार्यालयाकरता एस. एस. भुजबळ आदींची बदली करण्यात आली आहे.

इमारत प्रस्ताव विभागासह नियोजन व संकलन विभागाचे प्रमुख अभियंता डी. बी. छल्लारे, जे. सी. सिद्धपुरा यांचीही बदली अनुक्रमे इमारत प्रस्ताव शहर आणि पूर्व उपनगर विभागाच्या उपप्रमुख अभियंता पदी करण्यात आली आहे. याशिवाय एस. बी. मोमीन, आर. बी. डिचवलकर या दोघांचीही बदली इमारत प्रस्ताव विभागात शहर भागाकरता आली आहे.

पर्जन्य जलवाहिनी विभागाचे सहायक अभियंता एस. बी. संख्ये यांची बदली दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंता पदी करण्यात आली आहे. याच पदावरच के. पश्चिम विभागाचे सहायक अभियंता एस. यू. बोरसे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरचे इमारत प्रस्ताव विभागाचे सहायक अभियंता मनोज केदारे यांची बदली एम. पश्चिम विभागात पदनिर्देशित या पदावर करण्यात आली आहे.

दुय्यम अभियंतापदी बढती मिळालेले कनिष्ठ अभियंता
नितीन नडगिरे, नरेश मालवणकर, प्रभाकर सुर्यवंशी, संतोष यादव, अमोल भेलकर, प्रकाश राठोड, नामदेव सावंत, मनोज दुबे, पुष्कर मेश्राम, सचिन यादव, महेश गोसावी, रवींद्र विधाटे, आनंद नेरूरकर, अरविंद कदम, कृष्णाजी परब, दयानंद पाटील, करण साधवानी, सुनील पिंगळे, नयना पवार, विशाल साखरकर, भूषण राऊत, नवनीत जाधव, समीर राठोड, राजेश लोखंडे, सोमेश शिंदे, निरवकुमार जैसूर, योगेश मोगल, संदीप सावंत, संतोष कुलकर्णी, नीलेश नारकर, अर्चना जाधव, अविकेत चौधरी, संतोष भिलारे, सोमनाथ गोरे, संकेत भुजबळ, रवींद्र बऱ्हे, सत्वशील व्हटकर, शशिकांत भोईर, अरुणा शिंदे, पल्लवी जगताप, नितेश जाधव, प्रेमानंद सरकाटे, मुकेश गोडसे, अभिजीत रसाळ, संदीप शेलार, स्वप्नील राणे, अर्चना लोणे, राजेश तावडे, प्रफुल्ल तावडे, निशा दळवी, धनश्री होसूरकर, स्मृती कणसे, रजनी पारखे, प्रणाली धामणसकर, अनुसया पार्टे, नयना शिरसाठ, सविता वाघ, हिरेन गांधी, माधव कुलकर्णी, राजेश सोनावणे, महेंद्र मांगुरे, परमानंद रामटेके, दत्तात्रय माने, पंकज मेहेर, श्रीपाद पाटील, मधुसुदन कांबळी, शुभांगी देसाई, दत्तात्रय देसाई, संगीता दुर्गुडे, आरती सदानशिवे, वृषाली घोडेकर, समीर गुरव, जितेश जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, संदीप खरात, अशोक लाडके, शिवनारायण काकड, प्रशांत पालवे, संतोष खरवतेकर, निता तोडकर, जगदीश सारंग, जगदीश सारंग, जगदीश तुपे, अमोल थोरात, दुहिता महाले, सचिन भुर्के, आनंद साळवे, संतोष भोईटे, संतोष पाटील, केशव ओवे, निखिल वेंगुर्लेकर, विनायक आव्हाड, अल्ताफ बाटलीवाला, रवींद्र शेळके, सुमीत ढेकळे, बाळकृष्ण कामतेकर, पराग काळे, सिद्धेश पाटील, मनोज मयेकर, महेंद्र काथवटे, गितांजली चाफळकर, प्रवीण नानोटे, सुवर्णा सूर्यवंशी, देवेंद्र भांगरे, दिलीप धूम, दशरथ सुपे, योगेश कोकणी, महादेव कोरे, संतोष जाधव आदी.

निलंबितांच्या जागी नवे अधिकारी
लाचखोरी प्रकरणी अटक झालेले भायखळा येथील इमारत प्रस्ताव विभागातील कार्यकारी अभियंता सुनील राठोड यांच्या जागी जलअभियंता विभागाचे कार्यकारी अभियंता एम. आर. कुंटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुय्यम अभियंता बी. जी. बिरासदार यांच्या जागी जी. एस. मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचारामुळे या विभागातील उलथापालथ करण्यात आली असली, तरी महापालिकेच्या अधिका-यांनी मात्र ही बदली प्रशासकीय कारणांसाठी झाल्याचे सांगितले.

एफ-दक्षिणचे कुडवा सहायक आयुक्त
दुय्यम अभियंता असलेल्या यू. के. कुडवा यांना बढती देत एफ/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक आयुक्तांचे एक पद रिक्त असल्यामुळे या पदावर त्यांची वर्णी लावण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version