Home विदेश इसिसकडून रसायन शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता

इसिसकडून रसायन शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता

1
संग्रहित छायाचित्र

‘इसिस’ या कुख्यात दहशतवादी गटाकडून यापुढे क्लोरिन आणि विषारी गॅसचा मारा केला जाऊ शकतो, अशी माहिती सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनान यांनी दिली.

संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन- ‘इसिस’ या कुख्यात दहशतवादी गटाकडून यापुढे रसायन शस्त्रांचा वापर होऊ शकतो. यापुढे इसिसकडून क्लोरिन आणि विषारी गॅसचा मारा केला जाऊ शकतो, अशी माहिती सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनान यांनी दिली. इसिसची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी या गॅसची निर्यात केली जाऊ शकते.

इसिसने युद्धजन्य परिस्थितीत रसायन शस्त्रांचा वापर केला आहे, अशी कितीतरी उदाहरणे आहेत. इसिसचा आर्थिक डोलारा ढासळू नये याकरता ते गॅसची निर्यात करतील आणि यापुढे दहशतवादी कारवायांमध्ये इसिसकडून रसायन शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती ब्रेनान यांनी गुरुवारी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.

सीआयएने असा दावा केला आहे की, इसिस अल्प प्रमाणात क्लोरीन आणि विषारी गॅसचे उत्पादन करू शकते, अशी माहिती सीबीएसने वृत्तपत्राने दिली.

इसिसचा आर्थिक डोलारा सुधारण्यासाठी इसिस या रसायन शस्त्रांची निर्यात करणार असल्याची शक्यता ब्रेनान यांनी वर्तवली. इसिस रसायन शस्त्रांची निर्यात करण्याची शक्यता असून आपण त्यांचे निर्यातीचे मार्ग बंद केले पाहिजेत. याबरोबरच ज्या मार्गाने त्यांची तस्करी चालते यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असे त्यांनी प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले.

ब्रेनान म्हणाले की, अमेरिकन गुप्तचर संस्था इसिसचा समूळ नाश करण्यासाठी सक्रीय आहे. त्यांनी इसिसच्या सीरिया आणि इराक येथील तळाची माहिती गोळा केली आहे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला गुप्तचर संस्थेचे प्रमुख जेम्स क्लॅपर यांनी गुप्तचर विभागाच्या बैठकीत इसिस सीरिया आणि इराकमध्ये रसायन शस्त्रांचा वापर करत आहेत, अशी माहिती दिली होती.

1 COMMENT

  1. इसिस चा जन्म दाता बाप अमेरिका हे सर्व जगाला माहित आहे.ज्यांना माहित नाही ते मुर्ख आहेत.भारत मुर्ख लोकांचा देश आहे. हे सर्व जगाला माहित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version