Home विदेश ‘इसिस’चे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका सायबर बॉम्ब वापरणार

‘इसिस’चे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका सायबर बॉम्ब वापरणार

1

सीरिया व इराकमध्ये धुमाकूळ घालणारी नृशंस दहशतवादी संघटना ‘इसिस’ला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने जगात पहिल्यांदाच सायबर बॉम्ब टाकण्याची योजना तयार केली आहे. 

वॉशिंग्टन – सीरिया व इराकमध्ये धुमाकूळ घालणारी नृशंस दहशतवादी संघटना ‘इसिस’ला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने जगात पहिल्यांदाच सायबर बॉम्ब टाकण्याची योजना तयार केली आहे. हे सायबर अस्त्र नवीन असून ‘इसिस’ची सर्व कम्युनिकेशन यंत्रणा बंद पाडण्यात येणार आहे.

पेंटागॉनचे उपसचिव रॉबर्ट वर्क म्हणाले की, आम्ही सायबर बॉम्ब टाकणार आहोत. यापूर्वी आम्ही कधीही या शस्त्राचा वापर केलेला नाही. सध्या आम्ही ‘इसिस’वर हवाई हल्ले करत आहोत. आता आम्हाला सायबर हल्ले करायचे आहेत. त्यासाठी आम्ही आमच्या अंतराळ क्षमतेचा वापर करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर म्हणाले की, आम्ही ‘इसिस’च्या सर्वच यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण करणार आहोत. त्यामुळे त्यांचे नेटवर्क निकामी ठरेल. त्यामुळे त्यांचे संपूर्ण संदेशवहन बंद पडेल. त्यामुळे त्यांची संख्या व अर्थव्यवस्थेवर आमचे नियंत्रण मिळेल.

ही यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी माहिती गोळा केली आहे. आता आम्ही त्यांचे कमांड उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेलो आहोत. सायबर युद्धासाठी लागणारी खास यंत्रणा अमेरिकेने तयार केली असून ते युद्धाचे खास शस्त्र बनले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

  1. इसिस हि दहशतवादी खास यंत्रणा अमेरिकेने तयार केली असून, त्यांचे नेटवर्क त्यांचे संपूर्ण संदेशवहनअमेरिकेने तयार केली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर जगाला वूल्लू बनवत आहेत.सीरिया व इराकचे तेल अमेरिका फुकट वापरत आहे.त्यांचे नेटवर्क निकामी ठरेल. त्यामुळे त्यांचे संपूर्ण संदेशवहन बंद पडेल. त्यामुळे त्यांची संख्या व अर्थव्यवस्थेवर आमचे नियंत्रण मिळेल.खोट बोलताना खरे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version