Home देश ‘इस्त्रो’ला इंदिरा गांधी पुरस्कार

‘इस्त्रो’ला इंदिरा गांधी पुरस्कार

1

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) इंदिरा गांधी शांतता आणि विकास पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) इंदिरा गांधी शांतता आणि विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. अंतराळ क्षेत्राचा वापर करून आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत केल्याबद्दल हा बहुमान प्राप्त झाला आहे.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही घोषणा केली. मंगळयान मोहीम, अंतराळ संशोधन आदी क्षेत्रातून इस्त्रोने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे.

तसेच देशातील ग्रामीण भागात आणि दुर्गम भागातील लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यात इस्त्रोने मोठी भूमिका बजावली आहे.

भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची गुणवत्ता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचे इस्त्रोने दाखवून दिले आहे. तांत्रिक आणि अत्याधुनिकतेत भारताने अव्वल देशांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version