Home देश उत्तर प्रदेशात विषारी दारुमुळे ३१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात विषारी दारुमुळे ३१ जणांचा मृत्यू

0

उत्तरप्रदेशातील लखनऊ आणि उन्नावमध्ये विषारी दारु पिऊनमृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.

लखनौ – उत्तरप्रदेशातील लखनऊ आणि उन्नावमध्ये विषारी दारु पिऊनमृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तर १०० हून अधिक जणांवर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

सोमवारी रात्री ही घटना घडली. मलिहाबादमधील दातली गावत ही विषारी दारु बनवण्यात आली होती. ही विषारी दारु पिऊन लखनऊमध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला तर उन्नाऊमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दारु विक्रेत्याला अटक केली आहे.

दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रकऱणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकऱणातील दोषींवरही तात्काळ कारवाई कऱण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version