Home महामुंबई उत्सवांतील गोंगाट थंडावणार!

उत्सवांतील गोंगाट थंडावणार!

1

एखादा उत्सव साजरा करताना नियमांचे वारंवार उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणा-या सार्वजनिक मंडळांना दुस-या वर्षी मंडप व ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी कशी दिली जाते, असा परखड सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी केला

मुंबई – एखादा उत्सव साजरा करताना नियमांचे वारंवार उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणा-या सार्वजनिक मंडळांना दुस-या वर्षी मंडप व ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी कशी दिली जाते, असा परखड सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी केला. सार्वजनिक मंडळांना मंडप व ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देताना त्यांच्याकडून अनामत रक्कम घ्यावी आणि नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण केल्यास ती रक्कम जप्त करण्याची कारवाई सरकारने करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

[poll id=”832″]

ठाणे जिल्ह्यात होणा-या ध्वनिप्रदूषणासंबंधी डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी सुरू आहे. विविध सण आणि उत्सव साजरे करताना सार्वजनिक मंडळांकडून मोठया प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. पोलिसांत तक्रार दाखल करूनही अशा मंडळांवर किंवा आयोजकांवर कारवाई होत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. नियमांचे उल्लंघन करत ध्वनिप्रदूषण करणा-या अशा मंडळांना पुढील वर्षी मंडप व ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे.

दरम्यान, पर्यावरण संरक्षण कायदा व इतर कायद्यांतर्गत ध्वनिप्रदूषण करणा-या मंडळांविरोधात ‘एफआयआर’ दाखल केल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. मात्र अशा मंडळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत न्यायाधीश ओक यांनी व्यक्त केले. तसेच मंडप व ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देताना अशा मंडळांकडून अनामत रक्कम घेण्याची व नियमांचे उल्लंघन केल्यास तीच रक्कम जप्त करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली. या सर्व सूचना आणि कारवाईबाबत २१ नोव्हेंबपर्यंत उत्तर द्यावे, असे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

1 COMMENT

  1. हाईकोर्ट का फ़ैसला आने के बाद भी आम रोड रोक मंडप बाधा गया है बी एम सी को शिकायत करने के बाद भी कोई कार्रवाई नहीं की मुबादेवी रोड आम जनता को आने नहीं दिया जा रहा यह रोड एक महीने पहले नया बनाया गया है पुरे नये रोड पर क़रीबन ३४० खड़े खोदकर मंडप बाधा है हमारे एसोसिएशन ने (सी वार्ड ) के सीनियर ओफीसर से मील कर शिकायत की साथ में हाईकोर्ट के फ़ैसले की ज्ञेरोकस कोपी दी पर ओफीसर ने मंडप बाँधने वालों के ख़िलाफ़ कोई कार्रवाई नहीं कि गई सी वाडॅ के ओफीसर को नये रोड पर खड़े खोदकर मंडप हटा कर क़ानूनी कार्रवाई करनी चाहिये थी पर मंडप बाँधने वाले और सी वाडॅ ओफीसर की मिली भगत होने की वजय से कोई कार्रवाई नहीं हो रही है हाईकोर्ट १३-३-२०१५ को फ़ैसला देता है कि आज के बाद आम रोड पर मंडप नहीं बाँधने नहीं दिये जायेंगे पर सी वाडॅ के ओफीसर हाईकोर्ट का फ़ैसला मानने को तैयार नहीं है मंडप बाँध कर आम जनता को आने जाने को रोक दिया है बार बार शिकायत करने के बाद भी कोई नहीं हो रही है

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version