Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची सरपंच होण्याची तरी लायकी आहे का?

उद्धव ठाकरेंची सरपंच होण्याची तरी लायकी आहे का?

0

पूर्वजांच्या पुण्याईवरच आजवरची वाटचाल करत आलेल्या उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याची तरी लायकी आहे का, असा सवाल करत युवानेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कधीच साकार होणार नाही, आगामी विधानसभेत त्यांच्याविरुद्ध कोणत्याही मतदार संघात उभे राहून त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची आपली तयारी आहे, असे आक्रमक मत या वेळी व्यक्त केले.

कोल्हापूर – पूर्वजांच्या पुण्याईवरच आजवरची वाटचाल करत आलेल्या उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याची तरी लायकी आहे का, असा सवाल करत युवानेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कधीच साकार होणार नाही, आगामी विधानसभेत त्यांच्याविरुद्ध कोणत्याही मतदार संघात उभे राहून त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची आपली तयारी आहे, असे आक्रमक मत या वेळी व्यक्त केले.

चव्हाण उद्योग समूहाच्या वतीने मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल युवा नेते नितेश राणे, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, दै. ‘पुढारी’चे संपादक प्रतापसिंह जाधव आदींचा कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.

गत लोकसभा निवडणुकीवेळी दुस-या-तिस-या फळीतील कार्यकर्त्यांची नाराजी नेतृत्वाच्या नेमकी लक्षात आली नाही. त्यामुळे पराभव झाला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पुनश्च घवघवीत यश निश्चितपणे मिळवेल,  असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. पक्षनेते, आपले मार्गदर्शक, वडील नारायण राणे यांच्या सूचनेनुसार सध्या कणकवलीत लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगून कोकणात मोठे होण्यासाठी ‘राणे’ यांच्यावर विरोधकांना टीका ही करावीच लागते, असेही नितेश राणे यांनी या वेळी नमूद केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version