Home मध्यंतर वास्तू वेध एअर कंडिशन लावण्यापूर्वी

एअर कंडिशन लावण्यापूर्वी

0

हल्ली प्रत्येक ठिकाणी म्हणजे घर, ऑफिस, रेस्टॉरंट, रिटेल शॉप अगदी सगळीकडे एक घटक अतिशय आवश्यक झाला आहे आणि तो म्हणजे एसी. अर्थात एअर कंडिशन. असा हा एसी लावताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात हे जाणून घेऊ या.

मागील भागात आपण पंच्याहत्तरी पूर्ण केली. हो मी मुद्दाम असं म्हणतोय, कारण ही पंच्याहत्तरी फक्त ‘माझी घरंदाजी’ची नाहीए. तर ती ‘प्रहार’ आणि या लेखमालेच्या प्रत्येक वाचकाची आहे. कारण माझा प्रत्येक लेख हा आधीच्या लेखावर मिळालेल्या प्रोत्साहनाने प्रेरित आहे. त्यामुळे मागील लेखावर शुभेच्छांचा वर्षाव करणा-या ‘प्रहार’च्या सर्व वाचकांचे शतश: अभार. लवकरच शंभरी गाठायची आहे आपल्याला.

आज आपण ऑफिसमधल्या खरं तर ऑफिस काय आज प्रत्येक ठिकाणी म्हणजे घर, ऑफिस, रेस्टॉरंट, रिटेल शॉप अगदी सगळीकडे असणा-या एक महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलतोय. तो आहे HVAC  सिस्टीम. म्हणजे आपला सर्वाचा लाडका एसी- एअर कंडिशनर.

खरं तर एसी हे त्यांचं सर्वश्रृत नाव असलं तरी त्याचं म्हणजे या सिस्टीमचं टेक्निकल नाव आहे,  HVAC  सिस्टीम म्हणजे हीट वेंटिलेशन एअर कंडिशनिंग. या नावातच खरं तर त्याचं सगळं कार्य दडलंय. एसी खरं म्हणजे काय करतो हे त्या नावातच आहे.

आजकालच्या या उन्हाळ्याच्या दिवसांत एसी असा नुसता शब्द उच्चारला तरी एक वा-याची झुळूक आल्यासारखी वाटते. इतकी आपल्याला आता एसीची सवय झाली आहे. आणि जसा काळ बदलत जातो तसं तसं आपली चैन ही आपली गरज बनत जाते.

जी गोष्ट काही वर्षापूर्वी रेफ्रिजरेटरची होती. फ्रिज घरी असणं ही एक चैन होती. म्हणजे खरं तर तेव्हाची लाईफस्टाईल अशी होती की लोक म्हणायचे, अहो, हवाच कशाला फ्रिज? थंड पाण्यासाठी मडकं होतं. रोजच्या रोज ताजी भाजी आणली जायची.

जेवण तर रात्रीचं किंवा सकाळचं उरायचंच नाही. त्यामुळे ते ठेवायचा प्रश्नच नाही. म्हणजे एखादी नाशवंत गोष्ट स्टोअर करायची आणि ती नंतर खायची हा विषयच नव्हता. मात्र आपली लाईफस्टाईल हळूहळू बदलत गेली आणि या ज्या गोष्टी आपण आधी करत नव्हतो त्या बदलत्या काळानुरूप करू लागलो. फ्रिजची चैन हळूहळू गरज बनत गेली. तसंच टीव्हीचं आणि एसीचं आहे.

पूर्वी मुळात जास्त खासगी कार्यालयांचा सुळसुळाट नव्हता आणि असली तरी फार थोडी होती. हळूहळू कॉर्पोरायझेशन होत गेलं. परदेशी कंपन्या, बँका आल्या आणि कार्यालयाचं रूपडं बदलून गेलं. एसी आवश्यक झाला. अर्थात, माझ्या मते कार्यालयात एसी ही चैन कधीच नव्हती. ती एक मूलभूत गरज होती, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण दिवसभर तुम्ही कामाच्या ताणाखाली असताना एक बेसिक कम्फर्ट लेव्हल प्रत्येकाला मिळणं आवश्यक आहे आणि खरं तर याचा थेट परिणाम त्या एम्प्लॉईची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्यात होते.

पर्यायाने कंपनीला फायदा होतो. त्यामुळे मग HVAC  सिस्टीम ही कार्यालयात असणं खरं तर मस्ट आहे. हा आता कार्यालयाच्या आकारमानावर त्याचे प्रकार अवलंबून आहेत. कारण ठरावीक आकाराच्या कार्यालयानुसार त्या त्या प्रकारची एसी सिस्टीम ठरवावी लागते. ही ठरवायला काही प्रमाणं आहेत. मुळात या HVAC  सिस्टीमचं बरंच परिमाण आहे. म्हणजे त्याची ठरावीक क्षमता आहे.

जशी फ्रिजची क्षमता लिटरमध्ये मोजतात तसंच HVAC  हे टनमध्ये मोजतात. साधारण कुठलंही मशीन हे ०.५ टोनएजपासून सुरू होतं. मग नंतर ०.५/०.७५/१.०/१.५/२ असे टोनएज उपलब्ध असतात. मात्र हे टोनएज शक्यतो डोमेस्टिक मशिन्ससाठी असतात. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल तर त्यासाठी वेगळ्या सिस्टीम आहेत. यावर आपण चर्चा करणारच आहोत.

आता आपण या HVAC  चे प्रकार समजून घेऊ.

१. विंडो एसी

२. हाय वॉल म्हणजे स्प्लिट एसी

३. चील वॉटर सिस्टीम

४. डक्टेबल स्प्लिट

हे मुख्यत्वे प्रकार आहेत. मग आपल्या गरजेनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार त्यातला कुठला प्रकार निवडायचा हे आपल्या हातात असतं. अर्थात हे सगळं करायला वेगळा HVAC कन्सल्टंट असतो. आणि तो सिस्टीम डिझाईन करतो. म्हणजे यात पण एक ठरावीक प्रोसेस असते.

अर्थात, या सगळ्या बेसिक टेक्निकल गोष्टी आम्हा डिझायनरला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आम्ही प्रत्यक्ष ही सिस्टीम डिझाईन करत नसलो तरीसुद्धा त्याची संपूर्ण माहिती आम्हाला असणं महत्त्वाचं आहे. मुळात एक बेसिक HVAC उसिस्टीम डिझाईन करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका रूममध्ये ठरावीक प्रमाणात गरम हवा आहे आणि ती आपल्याला थंड करायची आहे. मग सर्वप्रथम ती गरम हवा किती आहे ते बघणं आणि मोजणं आवश्यक आहे.

ही गरम हवा काही गोष्टींमुळे जनरेट होते. एक तर अ‍ॅम्बियंट टेम्परेचर म्हणजे बाहेरची हवा आणि उष्णता किती आहे आणि त्याचा त्या बिल्डिंगवर म्हणजेच पर्यायाने त्या ऑफिसवर किती परिणाम होईल हे पाहावं लागतं. त्यासाठी मग त्या रूमची ‘उत्तर’ दिशा तपासून त्यानुसार सूर्याची दिवसातली मार्गक्रमणा लक्षात घेतली जाते. त्यामुळे मग समजतं की कुठला कोपरा किंवा कुठला एरिया जास्त गरम असणार आहे.

त्यानंतर ऑफिसमधलं प्रत्येक मशीन किंवा रिक्वायर्मेट हे हीट जनरेट करत असतं. ती हीटसुद्धा लक्षात घ्यावी लागते. मशीनच्या त्या त्या लोडनुसार त्याचा हीट लोड वर्करूट घेतो. तसंच मग लाईट्सचा लोड असतो आणि त्याचबरोबर असतात ती माणसं.

अगदी थोडया फार प्रमाणात का होईना; पण प्रत्येक व्यक्ती ही आपल्या शरीरातून उष्णता बाहेर फेकत असते आणि तीसुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे या सर्व गोष्टी एकत्र करून एक हीट लोड समरी बनवली जाते. ही खरी समरी असते. या प्रवासाची सुरुवात असते. मग त्यानुसार साधारण ज्या जागेसाठी किती टनचा एसी लागेल याची आकडेमोड करावी लागते. साधारण टुंबरोलप्रमाणे १०० स्क्वे. फूट मागे एक टन एसी आवश्यक असतो. खरं तर यात खूप गोष्टींचा समावेश आहे. मग हे आणि एसीचे बाकीचे फॅक्टर आपण नंतर समजून घेऊयात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version