Home टॉप स्टोरी एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानेही फेटाळला!

एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानेही फेटाळला!

1

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

नवी दिल्ली- कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यामुळे आता एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.

अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून चौकशीदरम्यान जाणीवपूर्वक चुकीची आणि अर्धवट माहिती देत आहेत. त्यामुळे त्यांची पोलीस कोठडीतील चौकशी अपरिहार्य आहे, असे सांगत राज्य सरकारने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला सर्वोच्च न्यायालयात तीव्र विरोध दर्शवला होता.

एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.

ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथे नव्हतो, तसेच झालेल्या घटनेत आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानेही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मिलिंद एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

1 COMMENT

  1. जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला
    मग त्यातल्या एकाला तरी पकडून विचाराकी कोणी चिथावणी दीली !!!!

    सगळेच राजकारण बाकी काही नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version