Home Uncategorized एचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त

एचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त

0

बँकांकडून रेपोदर कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना दिला जात नसल्याची आरबीआय गव्हर्नरांची तक्रार खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने अखेर मनावर घेतली.

मुंबई- बँकांकडून रेपोदर कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना दिला जात नसल्याची आरबीआय गव्हर्नरांची तक्रार खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने अखेर मनावर घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बँकेने आपला आधार कर्जदर ०.३५ टक्क्यांनी कमी करत तो ९.३५ टक्क्यांवर आणला. बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात कमी कर्जदर असून मंगळवारपासून लागू होणार आहे.

इतर बँकांनीही कर्जदर कमी करण्याचा सपाटा लावल्यास ऐन सणासुदीत गृह आणि वाहन खरेदीला बळ मिळेल. सद्य:स्थितीत भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या पहिल्या तीन बँकांची ९.७० टक्के एवढा आधार कर्जदर आहे. इतर बँकांनीही व्याजदर कपातीचा सपाटा लावल्यास गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतर येणा-या दिवाळीत ग्राहकांसाठी ती गृहखरेदी किंवा वाहनखरेदीसाठी परवणी ठरणार आहे.

अ‍ॅक्सिस बँकेने मुदतठेवींचे दर अध्र्या टक्क्याने घटवले

देशातील तिस-या क्रमांकाच्या खासगी बँकेने आपल्या मुदतठेवींचे दर अध्र्या टक्क्यापर्यंत घटवण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. नवे दर मंगळवारपासून लागू होणार असून सर्व प्रकारच्या मुदतठेवींवरील व्याजदरात ०.२० ते ०.५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version