Home क्रीडा एमसीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांनी अर्ज भरला

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांनी अर्ज भरला

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज भरला. 

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज भरला. पवार यांना सत्तेवर असलेल्या रवी सावंत पॅनलसह विजय पाटील यांच्या पॅनलने पाठींबा दिला आहे. शरद पवार यांनी या पदासाठी पारसी पायोनिअर क्लबतर्फे अर्ज भरला आहे. 

भाजपा नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी अर्ज भरला आहे. त्यापूर्वी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी आपला अर्ज मागे घेतला आहे. मी म्हाडदळकरगटासोबतच रहाणार आहे. मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा मी सुचक आहे. त्यामुळे यावेळी आपण माघार घेत असून आपण या निवडणुकीत मुंडे यांच्या सोबत रहाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. तसेच रवी सावंत आणि म्हाडदळकर गटातील सर्वांचे आभार मानले.

शेलार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता मुंडे आणि पवार यांच्यात थेट लढत रंगणार आहे. एमसीएची निवडणूक १८ ऑक्टोबरला होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version