Home देश ‘एस्कॉर्ट’च्या नावाखाली गोव्यात ‘ऑनलाईन सेक्स’ व्यवसाय!

‘एस्कॉर्ट’च्या नावाखाली गोव्यात ‘ऑनलाईन सेक्स’ व्यवसाय!

1
संग्रहित छायाचित्र

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने कळंगुट येथे छापा टाकून ‘ऑनलाईन सेक्स’ व्यवसायाचा पर्दाफाश केला.

संग्रहित छायाचित्र

पणजी- गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने कळंगुट येथे छापा टाकून ‘ऑनलाईन सेक्स’ व्यवसायाचा पर्दाफाश केला. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून; त्याची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कळंगुट येथील या कारवाईत पाच दलालांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर आठ युवतींची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. दलालात तिघे मुंबई आणि महाराष्ट्रातील आहेत.

कळंगुट येथे सध्या पर्यटन मोसम असल्याने देशभरातील पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. अशा रंगेल पर्यटकांना इंटरनेटच्या माध्यमातून ‘एस्कॉर्ट’ पुरवण्याच्या नावाखाली युवती पुरवण्यात येत असतात. दलाल या मुलींना थेट ठराविक हॉटेलमध्ये आणून ग्राहकाच्या ताब्यात देतो. त्यापूर्वी हाच दलाल ‘ती’ युवती आणि स्वत:च्या नावावर दोन खाल्या बुक करतो आणि ग्राहकाने पैशांचा ‘व्यवहार’ (काही हजार रुपयांच्या घरातील) पूर्ण केला की ‘ती’ युवती त्याच्या ‘ताब्यात’ देण्यात येते. दलाल शेजारच्या खोलीतच थांबतो. पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने बोगस ग्राहक तयार करून या अनैतिक व्यवहाराची भांडाफोड केली.

हा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अत्याधुनिक तांत्रिक सुविधांमार्फत करण्यात येत असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कळंगुट येथील धाडीत सुटका करण्यात आलेल्या युवती या कोलकाता, आसाम, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील असून २१ ते २८ वष्रे वयोगटातील आहेत. सर्वाना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी मेघना नायर (२८, मुंबई), सुमन दास (२५, कोलकाता), गौरेश पालेकर (२७, पेडणे), रणजी रणवीर (२३, नांदेड), चंद्रशेखर मेहरा (२८, ओडिशा), दक्ष बनसोडे (२४, महाराष्ट्र), उत्तम बेहरा (२७, ओडिशा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.

1 COMMENT

  1. पोलिसांना हप्ता न देता धंदा करणाराची माहिती पेपर मध्ये येते.हे खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version