Home महामुंबई ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन

ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन

1

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे शनिवारी निधन झाले. कृष्णराज हे कर्करोगाने त्रस्त होते.

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे शनिवारी निधन झाले. कृष्णराज हे कर्करोगाने त्रस्त होते.

गेले काही महिने त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यांनी ‘डिस्चार्ज’ दिल्यानंतर शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कृष्णराज यांच्या पश्चात पत्नी वृंदा तसेच मुलगा आदित्य आणि मुलगी ऐश्वर्या असा परिवार आहे. वडिलांची प्रकृती बिघडल्याने ऐश्वर्या दुबई दौ-यावरून परतली होती. अभिनेता अभिषेक बच्चनही न्यूयॉर्क दौरा सोडून मुंबईत परतला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version