Home महामुंबई ऑनलाईन मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबाबत संस्थांची नाराजी

ऑनलाईन मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबाबत संस्थांची नाराजी

1
संग्रहित छायाचित्र

मूल दत्तक घेणे ही भावनिक प्रक्रिया आहे. दत्तक प्रक्रिया ऑनलाईन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत विविध संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई- मूल दत्तक घेणे ही भावनिक प्रक्रिया आहे. दत्तक प्रक्रिया ऑनलाईन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत विविध संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाईन शॉपिंग ट्रेंड ही परंपरा देशात रुजू लागल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मुले दत्तक घेण्याची वादग्रस्त योजना केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

मात्र, मुले दत्तक घेताना काही महत्त्वाच्या बाबींबाबत गुप्तता बाळगणे गरजेचे असते. याकडे मात्र, गांधी यांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

भारतात ५० हजार अनाथ मुले आहेत. मात्र, दरवर्षी भारतातील दत्तक घेण्याचे प्रमाण ८०० ते हजार आहे. दत्तक प्रक्रिया राबवणा-या संस्थांच्या वेळकाढू धोरणामुळे हे घडत आहे.

वर्ष-वर्ष जोडप्यांना तात्काळत बसावे लागते. रोज अनाथालयांच्या खेपा कमी होण्यासाठी गांधी यांनी चार महिन्यात ऑनलाईन पद्धतीने मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

मुलांना दत्तक देणे ही महत्वाची जबाबदारी असते. विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. यात कायदेशीर बाबींचाही समावेश असतो. याशिवाय ज्या जोडप्यांना मुले दत्तक देतात त्यांची संपूर्ण चौकशीही संबंधित संस्थेला करावी लागते.त्यामुळे ही प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करणे अशक्य आहे, अशी माहिती संबंधित संस्थेच्या सूत्रांनी दिली.

मूल दत्तक घेणारे पालक आणि मुलांची देशभरात एकच यादी तयार केली जाणार आहे. ज्या पालकांना मूल हवे असेल त्यांना आणि दत्तक देणा-या मुलांची सविस्तर नोंदणी केली जाणार आहे. नव्या दत्तक प्रक्रियेनुसार एका कुटुंबाला विविध अनाथालयांतील प्रत्येक एक अशी सहा मुले स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहेत.

यातील दोन बाळांची निवड करून त्यांची माहिती संबंधित संस्थांना कळवायची आहेत. त्यानंतर पुढील ४८ तासांत त्या दोन बाळांपैकी एकाला निश्चित करायचे. त्यानंतर पुढील कागदोपत्री प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी योजना मनेका गांधी यांनी आखली आहे. त्यामुळे ऑनलाईन मुले दत्तक देण्याऐवजी येथे मुलांचा अक्षरश: ऑनलाईन बाजार मांडला जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया संबंधितांनी व्यक्त केली.

योजनेत येणा-या अडचणी

महाराष्ट्रातील मूल दूरवरच्या राज्यात दत्तक दिले जाते. त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अनाथालयांच्या सेविकांवर असते. शिवाय मुले दत्तक घेण्याच्या नव्या प्रक्रियेनुसार पालक संबंधित संस्थेशी संपर्क साधायचे. त्यानंतर त्यांना मुले दाखविण्यात येत होती.

परंतु आता ऑनलाईन पद्धतीने मुले दाखविण्यात येत असल्याने गैरसमज होण्याची शक्यता वाढू शकते. कारण, बहुतांश वेळा फोटोमध्ये आणि प्रत्यक्षात व्यक्ती वेगळी दिसते. हा फरक इथेही दिसून येत शकतो. याशिवाय ज्या प्रक्रियेला दीड ते दोन वर्षे लागायचे ते आता चार महिन्यात पूर्ण करण्याच्या दबावामुळे अनेक त्रुटी राहण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version