Home विदेश ओबामांच्या भारत भेटीने चीन अस्वस्थ

ओबामांच्या भारत भेटीने चीन अस्वस्थ

1

भारत आणि अमेरिकेच्या दृढ होणा-या संबंधांनी चीन अस्वस्थ झाला आहे. चीनने भारताला अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या जाळयात न अडकण्याचा सल्ला दिला आहे.

बिजींग – भारत आणि अमेरिकेच्या दृढ होणा-या संबंधांनी चीन अस्वस्थ झाला आहे. चीनने भारताला अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या जाळयात न अडकण्याचा सल्ला दिला आहे.

चीनने भारता बरोबरचे रणनितीक आणि व्दिपक्षीय संबंध नव्या उंचीवर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलेल्या संदेशात भारताबरोबरचे रणनितीक आणि व्दिपक्षीय संबंध दृढ करुन, दोन्ही देशांची शांतता आणि समृध्दतेसाठी प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत बराक ओबामा यांनी दुस-यांदा भारत दौरा केल्याने चीन अधिकच अस्वस्थ आहे. चीनी प्रसारमाध्यमांचे या दौ-यातील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष तर आहेच पण त्याचवेळी नकारात्मक वार्तांकनही सुरु आहे.

अमेरिकेची भारत आणि चीनला परस्पराविरोधात उभे करण्याची योजना आहे. भारताने अमेरिकेच्या या जाळयात अडकू नये असे ग्लोबल टाईम्स आणि पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या लेखामध्ये म्हटले आहे.

1 COMMENT

  1. समुद्रात बोट बुडाली तर उंदीर आधी पळतात… चीन आणि पाकिस्तान तर खरे घूस आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version