Home टॉप स्टोरी ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द

ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे.

नवी दिल्ली –  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे. २७ जानेवारीला ओबामा ताज महालला भेट न देता नवी दिल्लीहून सौदी अरेबियाला जाणार आहेत.

२५ जानेवारीपासून तीन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनी बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आज संध्याकाळी ओबामा अमेरिकेहून भारताच्या दिशेने प्रयाण करतील.

या तीन दिवसांच्या दौै-यादरम्य़ान २७ जानेवारीला ओबामा त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासह आग्राच्या ताजमहालला भेट देणार होते. मात्र आग्रा दौरा रद्द कऱण्यात आल्याची माहिती शनिवारी अधिका-यांनी दिली. हा दौरा रद्द केल्याने २७ जानेवारीला लवकरच ओबामा सौदी अरेबियाच्या दिशेने निघणार आहेत. गुरुवारीच सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन झाले.

ओबामांचा भारत दौरा

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version