Home महामुंबई कचराबहाद्दरांना ५०० रुपये दंड

कचराबहाद्दरांना ५०० रुपये दंड

1

रेल्वे परिसरात कचरा करणा-या आणि थुंकणा-या प्रवाशांना आता मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला आहे.

मुंबई – रेल्वे परिसरात कचरा करणा-या आणि थुंकणा-या प्रवाशांना आता मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला आहे. रेल्वे परिसरात किंवा रेल्वेच्या डब्यात कोणीही घाण करताना आढळल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे परिसरात किंवा लोकलच्या डब्यात घाण करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. या स्वच्छतेच्या उपाययोजनांवर स्टेशन मास्टर आणि टी. सी. लक्ष ठेवणार आहेत.

[poll id=”780″]

रेल्वे परिसरात पूर्वी कचरा टाकताना किंवा थुंकणा-यांना केवळ १०० रुपये दंड होता. त्यामुळे प्रवासी कचरा टाकताना विचार करत नव्हते. आता ५०० रुपयांचा दंड केल्याने रेल्वे परिसरात कचरा करताना आता विचार करतील, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. पश्चिम रेल्वे पोलिसांनी रेल्वेत धूम्रपान करणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे.

पश्चिम रेल्वे पोलिसांनी आठ महिन्यांत चर्चगेट ते डहाणूदरम्यान ९०६ जणांना रेल्वेत धूम्रपान करताना पकडले. त्यांच्याकडून ९२ हजार ८५० रुपये दंड आकारला आहे. कलम १६७ च्या अंतर्गत ही कारवाई केली. तर चर्चगेट ते सूरत मार्गावर ९४० जणांना धूम्रपान करताना पकडले असून त्यांच्याकडून ९६ हजार ५० रुपये दंड आकारला आहे.

1 COMMENT

  1. बृहनमुंबई महानगरपालिकेने कंत्राट दारांच्या हातात दत्तक वस्ती योजना ही नवी योजना साफ सफाई अधिकारी अंतर्गत दिली. पण त्या विभागातील ना गटार साफ होत, ना नाले. खोकला आला आणि तो थुंकला म्हणून त्याच्या कडून रु. 100/- ते रु. 500/- दंड घेण्याकरिता माणसांची टोळी तयार करा, तेच कामगार हे तुंबलेली नाले, गटारे साफ करण्याकरिता लावा. म्हणजे त्याना जो महिन्यभराचा पगार दिला जातो त्याचा येथील मुंबईतील रहिवाश्याना भरपुर फायदा होईल. निदान पावसाळ्यात होणारी वाहतुक कोंडी तरी थांबेल. आधीच मुंबईचे प्लॅटफॉर्म, रुळ कितीतरी साफ आहेत, याकडे कधी पालिका आयुक्ताने लक्ष तरी दिले आहे का? मुंबईचे सुरळीत जीवन हे सर्व सामान्याकरिता भरपुर महत्वाचे आहे, मुंबईच्या रहिवाशाना ही रोजचिच दग दग आहे. मुंबईतील व्यक्ती कधी फिरताना श्वास तरी घेईल का अशी परिस्थिती झाली आहे ती लाचखोर अधिकार्‍यामुळे. जिथे तिथे कच-याचा ढीग आणि पालिका बॅनर लावते की स्वच्छ मुंबई आमची मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version