Home महामुंबई करिनाची तब्येत बिघडली

करिनाची तब्येत बिघडली

0

चाहतावर्गही बाळाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत असताना करिनाची तब्येत बिघडल्याने तिच्या घरी डॉक्टरांची टीम दाखल झाली.

मुंबई- कपूर आणि खान कुटुंबीयांसह सध्या करिनाचा चाहतावर्गही बाळाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. परंतु सध्या चिंताजनक बाब ही आहे की, करिनाची तब्येत बिघडली असून तिच्या घरी डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे.

काही दिवसांपूर्वी अमृता अरोरा, मलाइका अरोरा, करिश्मा कपूर यांच्यासह अन्य मित्रमंडळी करिनाच्या घरी पार्टीकरता गेले होते. या वेळी अतिउत्साहामुळे करिनाचे ब्लड प्रेशर वाढले. करिनाची तब्येत बिघडताच नवाब परिवार चिंताग्रस्त झाले. त्यांनी त्वरित डॉक्टरांना बोलवले. सध्या करिनावर उपचार सुरू असून ती आराम करत आहे. करिना आणि बाळ नीट असल्याची बातमी करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी दिली.

खान परिवारासोबतच कपूर खानदानही आता करिनाची देखभाल करण्यास व्यस्त झाले आहे. या वेळी सगळे करिनासोबत असून आई बनण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. गरोदर असतानाच्या काळात करिनाने जराही विश्रांती घेतली नाही. ती सतत एखाद्या फोटोशूट किंवा इव्हेंटमध्येच व्यस्त होती. ‘ग्रॅझिया’ मासिकासाठी तिने शेवटचे शूट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version