Home देश काँग्रेसचे नेतृत्व प्रियंकाकडे सोपवा

काँग्रेसचे नेतृत्व प्रियंकाकडे सोपवा

0

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने करत काँग्रेसचे नेतृत्व प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली.

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जाग जिंकू न शकल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘प्रियांका लाओ काँग्रेस बचाओ’ अशा घोषणा दिल्या. तसेच प्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या तीन जाग मिळाल्या आहेत. तर, काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. काँग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारुन अजय माकन यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे. तर दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लव्हली यांनीही प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

तब्बल १५ वर्ष दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१३च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसचा पराभव केला. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version