Home टॉप स्टोरी काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार – पाकिस्तान

काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार – पाकिस्तान

1

म्यानमारमध्ये भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला घाम फुटला असून राजकीय नेत्यानंतर आता लष्करी अधिकारीही भारतावर आगपाखड करत आहेत.

इस्लामाबाद – म्यानमारमध्ये भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला घाम फुटला असून राजकीय नेत्यानंतर आता लष्करी अधिकारीही भारतावर आगपाखड करत आहेत.

भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून दहशतवाद्यांना सहाय्य करत असल्याच्या उलटय़ा बोंबा खुद्द पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी शनिवारी मारल्या आहेत. तसेच काश्मीर मिळवण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचे नाव न घेता टीका करताना ते म्हणाले की, संपूर्ण जगाला पाकिस्तानातील सुरक्षेची चिंता आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन, बलुचिस्तानमध्ये रक्तपात, कराचीतील घातपाताला शत्रू जबाबदार आहे. शांततेसाठी पाकिस्तान कोणाशीही सहकार्य करायला तयार आहे. मात्र, आमच्या देशाच्या हिताचा, सार्वभौमत्वाचा बळी देऊ नव्हे, असे सांगायला ते विसरले नाहीत.

चीन-पाकिस्तान आर्थिक मार्ग प्रत्यक्षात आल्यास पाकिस्तानची परिस्थिती बदलून जाईल. या मार्गाला विरोध करणा-या शत्रूंची माहिती आम्हाला असून त्यांना आम्ही पराभूत करू, असेही त्यांनी सांगितले.

चीन-पाकिस्तान आर्थिक मार्ग व ग्वादार बंदर हे कोणत्याही परिस्थितीत तडीला नेले जातील. तसेच देशातून दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादाच्याविरोधात केवळ लष्करी कारवाई उपयुक्त ठरत नाही. तर संपूर्ण देशाचे प्रयत्न त्याच्यासाठी आवश्यक ठरतात, असे शरीफ यांनी सांगितले.

काश्मीरसहित स्वत:च्या हित संरक्षण जपण्यासाठी पाकिस्तान कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असेही शरीफ यांनी सांगितल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या पत्रकात नमूद केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version