Home देश वृंदावनमध्ये कृष्णाचे जगातील सर्वात उंच मंदिर

वृंदावनमध्ये कृष्णाचे जगातील सर्वात उंच मंदिर

2

जगातील सर्वात उंच मंदिर वृंदावनमध्ये उभे राहणार आहे. या मंदिराची उंची २१० मीटर असून त्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

वृंदावन- जगातील सर्वात उंच मंदिर वृंदावनमध्ये उभे राहणार आहे. या मंदिराची उंची २१० मीटर असून त्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या मंदिराचे भूमिपूजन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी झाले.

‘वृंदावन चंद्रोदय मंदिर’ या नावाने हे मंदिर उभारले जाणार आहे. या मंदिराचे काम ‘इस्कॉन’तर्फे केले जाईल. मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी राष्ट्रपतींनी ‘अनंत शेष स्थापना पूजा’ केली.

या मंदिरात ७० मजले असून त्यात कॅप्सूल लिफ्ट असणार आहे. सर्वात शेवटच्या मजल्यावर आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी खास गॅलरी असेल.

याच भागात ‘कृष्णलीला थीम पार्क’ उभारले जाईल. यात कथा सांगण्यासाठी खास विभाग, संगीतावर आधारित कारंजे, चांगले बगीचे, यमुना नदीत जलविहार, गोशाळा आदींचा प्रकल्पात समावेश असेल.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version