Home Uncategorized केर्न इंडियाला २०,४९५ कोटींची कर नोटिस

केर्न इंडियाला २०,४९५ कोटींची कर नोटिस

0
संग्रहित छायाचित्र

प्राप्तिकर विभागाने २०,४९५ कोटी रुपयांच्या कराची मागणी करणारी नोटिस केर्न इंडियाला पाठवली आहे.

नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने २०,४९५ कोटी रुपयांच्या कराची मागणी करणारी नोटिस केर्न इंडियाला पाठवली आहे. तत्कालीन प्रवर्तक असलेल्या केर्न एनर्जी पीएलसीने मिळवलेल्या भांडवली नफ्यावर केर्न इंडियाने कर वजा न केल्या प्रकरणी ही नोटिस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, कंपनीने हा कर भरण्यास नकार देताना स्वहित जपण्यासाठी सर्व पर्याय तपासण्याचे संकेत दिले.

या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच प्राप्तिकर विभागाने केर्न एनर्जी पीएलसीवर २००६मध्ये २४,५०० कोटी रुपयांच्या भांडवली नफ्या मिळवल्याप्रकरणी १०,२४७ कोटींची कर नोटिस बजावली होती. केर्न इंडियाला भारतातील सर्व मालमत्ता हस्तांतरातून हा नफा मिळवल्याचा कर विभागाचा आरोप आहे.

याच प्रकरणी केर्न इंडियाला आता नोटिस पाठवण्यात आली आहे. २०,४९५ कोटी रुपयांमध्ये १०,२४८ कोटींचा कर आणि व्याज म्हणून १०,२४७ कोटी रुपयांचा यात समावेश आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version