Home महाराष्ट्र कोकण कोकण रेल्वे टीसींमुळे प्रवाशांना भुर्दंड

कोकण रेल्वे टीसींमुळे प्रवाशांना भुर्दंड

1

कोकण रेल्वेचा प्रवास सोयीचा असला तरीही मुंबईला जाणा-या प्रवाशांना छत्रपती शिवाजी स्थानकावर तिकीट तपासनीसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

देवगड – कोकण रेल्वेचा प्रवास सोयीचा असला तरीही मुंबईला जाणा-या प्रवाशांना छत्रपती शिवाजी स्थानकावर तिकीट तपासनीसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मंगलोर एक्स्प्रेसने मुंबई गाठणा-या शेकडो प्रवाशांकडून तुमचे तिकीट हे ठाण्यापर्यंतच असल्याचे कारण देत दंडात्मक कारवाई म्हणून स्वत:चे खिसे भरण्याचा नवीन फंडा तिकीट तपासनीसांनी शोधला आहे. मात्र दंडाची पावती प्रवाशांना दिली जात नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे. मंगलोर एक्स्प्रेस ही गाडी दादर स्थानकात थांबत नसल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसतो.

वाढलेले अव्वाच्या सव्वा तिकीट दर यामुळे जिल्ह्यातील नागरिक तिकीट कमी तसेच सोयीस्कर प्रवास यामुळे रेल्वेने जाणे पसंत करतात. कणकवली येथून रात्री नऊ वाजता सुटून सकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचत असल्याने मंगलोर एक्स्प्रेस या गाडीला गर्दी होते. नेहमी या गाडीने मुंबईला जाणा-या प्रवाशांना या गाडीचे थांबे माहिती असतात.

कित्येक प्रवासी ठाणे येथून दुस-या गाडीने मुंबईतील अन्य भागात जातात. परंतु काही प्रवासी दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पुढे मार्गक्रमण करतात. कणकवली येथे काढलेले मुंबईतील त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी चालते हे कणकवली येथून सांगितले जाते. कित्येक प्रवाशांना दादर किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात नातेवाईक न्यायला येणार असतात. मात्र, मंगलोर गाडी दादर येथे थांबत नसल्याने अशा प्रवाशांची भंबेरी उडते.

छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकात तिकीट तपासनीस हे तिकीट ठाण्यापर्यंतच चालते, तुम्ही प्रत्येकी साडेचारशे रुपये दंड भरा, असे सांगतात. नागरिकांना हा भरुदडच असतो. तरीही प्रत्येक प्रवासी दंड भरतो. भरलेल्या दंडाची पावती मात्र दिली जात नाही.

एखाद्याने दंडाची पावती मागितली तर तुम्ही एकही रुपया देऊ नका, उद्या कोर्टात प्रत्येकी साडेतीन हजार रुपये भरा. तेही जमले नाहीत तर शिक्षा भोगा, अशी धमकी दिली जाते. मात्र, रेल्वेकडे लोकांकडून दिवशी हजारो रुपये उकळलेल्या दंडाची नोंद नाही. मात्र तिकीट तपासनीस झोळी भरू लागले आहेत. हे थांबणे आवश्यक आहे.

1 COMMENT

  1. पैसे देणारे मुर्ख आहेत.
    मुळात पैसे देऊ नये. आणि तिकीट तपासण्या व्यक्तीला चांगले फैलावर घेणे जमले पाहिजे.

Leave a Reply to padmakar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version