Home महाराष्ट्र कोल्हापूरचा टोल बंद होणार?

कोल्हापूरचा टोल बंद होणार?

1

कोल्हापूर शहरात बांधलेल्या रस्त्यांसाठी टोल देण्यास विरोध करणा-या कोल्हापूरकरांच्या लढयाला यश येण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर- शहरात बांधलेल्या रस्त्यांसाठी टोल देण्यास विरोध करणा-या कोल्हापूरकरांच्या लढयाला यश येण्याची चिन्हे आहेत. तीन वर्षे सातत्याने लढा दिल्यानंतर हा टोल बंद होण्याची शक्यता आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयआरबी कंपनीला टोल बंद करण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून ५२ किलोमीटरचे रस्ते आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीने बांधले. यासाठी २२० कोटी रुपये खर्च आला. हा खर्च ३० वर्षे टोल लावून वसूल केला जाणार होता. या विरोधात कोल्हापूरच्या नागरिकांनी सातत्याने जोरदार आंदोलन छेडले. सध्या या टोलविरोधासाठी आमरण उपोषण सुरू आहे.

आयआरबी कंपनीचा झालेला रस्ते बांधणीचा खर्च कोल्हापूर महापालिका देणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version