Home Uncategorized कोळसा कामगारांच्या पीएफवर रिलायन्स, आयसीआयसीआयची देखरेख

कोळसा कामगारांच्या पीएफवर रिलायन्स, आयसीआयसीआयची देखरेख

0

कोळसा खाण भविष्य निर्वाह संघटनेच्या विश्वस्त मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतलेला आहे. 

नवी दिल्ली- कोळसा क्षेत्रातील कामगारांच्या ६०,००० कोटी रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज प्रायमरी डीलरशिपची निवड करण्यात आली असल्याची माहिती सरकारी अधिका-यांनी म्हटले आहे.

कोळसा खाण भविष्य निर्वाह संघटनेच्या विश्वस्त मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतलेला आहे. कोलकाता येथे गुरुवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोळसा सचिव अनिल स्वरूप उपस्थित होते. एसबीआय, यूटीआय या कंपन्याही या शर्यतीत होत्या.

रिलायन्स कॅपिटल आणि आयसीआयसीआय या सर्वात कमी बोली लावणा-या कंपन्या ठरल्याने त्यांची निवड करण्यात आली. या संघटनेत ४.५ लाख सदस्य असून ६०,००० कोटींच्या निधीत आणखी वाढ होणार असून नव्या ६२,००० कंत्राटी कोळसा कामगार यामध्ये सामील होणार असल्याचे म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version