Home आनंदमंत्र खुलवा सौंदर्य

खुलवा सौंदर्य

1

व्हॅलंटाईन्स डेला आपल्या जोडीदाराला आकर्षित करावं, नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसावं यासाठी काही प्रसिद्ध कॉस्मेटिक्स ब्रँडसनी काही खास टिप्स दिल्यायत.

हिमालयाच्या चंद्रिका महेंद्रानं दिलेल्या टिप्स

»  ओठांना लाल रंगाचा लिप बाम लावा. त्यामुळे ओठांना जास्त भडकपणा न येता चांगला लूक येईल. ओठ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी बदामाच्या तेलात थोडी साखर घालून ते मिश्रण सकाळी ओठांना हलकेस रगडल्यानं ओठ मऊ होतात.

»  चेह-यावरची धूळ, आणि डेडस्किन घालवण्यासाठी क्लिनझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करा. त्यामुळे चेहरा अधिक तजेलदार दिसतो. चेह-यावर फेसपॅक वापरत असाल तर ते पॅक दहा मिनिटांना काढून टाका.

»  केसांना हर्बल तेल लावा. आणि तेल लावल्यानंतर गरम टॉवेलनं ते थोडा वेळ झाकून ठेवा. यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत जायला मदत होते.

»  डोळे आकर्षक दिसण्यासाठी डोळ्यांना काजळ लावा. पण काजळ लावण्यापूर्वी डोळ्याखाली थोडीशी पावडर लावा. त्यामुळे डोळ्याखालचा तेलकटपणा कमी होईल.
नॅचरल्स या ब्युटी आणि हेअर सलॉननं दिलेल्या टिप्स

»   चमकदार चेह-यासाठी क्लिनझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करा. त्याचबरोबर चेह-याचा निस्तेजपणा घालवण्यासाठी लिंबू आणि मध यांचा फेसपॅक वापरून तो चेह-यावर वापरा यामुळे चेह-याचा काळपटपणा निघून जाईल.

»  जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करणार असाल तर रेडिअन्स ग्लो, किंवा प्युअर मॉइस्ट फेशिअल करा.

»  केस चांगल्या प्रकारे धुवा, त्यांना कंडिशनर लावा. त्याचप्रमाणे अंडय़ाचा पांढरा भाग, दही, ऑलिव्ह ऑइल, आणि लव्हेंडर इसेन्स यांचं एकत्रित मिश्रण केसांना लावा यामुळे केसांचा निस्तेजपणा जाण्यास मदत होईल.

»  केसांना कंडिशनिंग करण्यासाठी ग्रीन टीचा वापर करा. अंड, ग्रीन टीची पानं, आणि दही हे चांगल्याप्रकारे फेटून घ्या आणि केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकाला लावा. हे हेअर पॅक अध्र्या तासांनी गरम पाण्यानं धुवून टाका. यामुळे केसांना चमक मिळते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version