Home महामुंबई गणेशभक्तांना दिलासा, उद्या मेगाब्लॉक नाही

गणेशभक्तांना दिलासा, उद्या मेगाब्लॉक नाही

0
संग्रहित छायाचित्र

मुंबईतील गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी गणेशभक्त राज्यभरातून आदल्या दिवसापासूनच मुंबईत दाखल होत असतात.

मुंबई – मुंबईतील गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी गणेशभक्त राज्यभरातून आदल्या दिवसापासूनच मुंबईत दाखल होत असतात. त्याचप्रमाणे मुंबईकरांना गणेशदर्शनासाठी असणारी रविवारची संधी लक्षात घेऊन रेल्वेने तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी अनंत चतुर्दशी असल्याने मुंबईकरांसह राज्यातून येणा-या गणेशभक्तांना रविवार हा एकच दिवस गणेशदर्शनासाठी मिळू शकतो. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे मेगाहाल होऊ नयेत यासाठी तीनही मार्गावर मेगाब्लाक रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रसासनाकडून सांगण्यात आले आहे.

विसर्जन सोहळ्यासाठी विशेष लोकल
विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या उपनगरांतील प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारी रात्री सीएसटी ते कल्याण या दरम्यान विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीहून ही गाडी रात्री १.३० वाजता सुटणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. याआधी पश्चिम रेल्वेनेही ८ आणि ९ सप्टेंबर रोजी विशेष गाडय़ा सोडणार असल्याचे जाहीर केले. चर्चगेटहून विरारसाठी मध्यरात्री १.१५, १.५५, २.२५ ला आणि पहाटे ३.२० ला लोकल सोडण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version