Home महामुंबई गणेशोत्सवातील सुरक्षेसाठी पोलिसांची पंचसूत्री

गणेशोत्सवातील सुरक्षेसाठी पोलिसांची पंचसूत्री

1

गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘पंच’सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुंबई- शहरातील गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘पंच’सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. पोलिसांनी गर्दुल्यांविरोधात विशेष मोहिम सुरू करतानाच मुलींची छेड काढणा-या टपोरींचा बंदोबस्त करणे, एकाहून अधिक लैंगिकगुन्हे दाखल असलेल्या आरोपींविरोधात गणेशोत्सवापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करणे आदींचा समावेश आहे.

प्रहार कौल-

[poll id=”758″]

गणेशोत्सवात मोठ्याप्रमाणत नागरिक घराबाहेर पडतात. या कालावधीत महिलांना त्रास होऊ नये, यासाठी गणेशोत्सवाच्या काळात पोलिस पाच प्रतिबंधात्मक उपाय करणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. या काळात चोरी व लुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गर्दुल्यांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. स्थानिक पोलिसांपासून वरिष्ठ अधिका-यांना गर्दुल्यांवर कारवाई करून अहवाल देण्यास सांगण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या कारवाई अंतर्गत मंगळवारी शहरात ५५ गर्दुल्ल्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात एक कोकेन व एक चरस वितरकालाही अंमली पदार्थ विरोधी (एएनसी) कक्षाच्या पोलिसांनी अटक केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी छेडछाड विरोधी पथक गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवणार आहेत. गर्दीच्या ठिकाणांचे पोलिस चित्रीकरण करणार आहेत. छेडछाड करतानाचे चित्रीकरण मुलांच्या पालकांना दाखवण्यात येणार आहे. या कारवाई अंतर्गत उत्तर प्रादेशिक परिमंडळ क्षेत्रातून २७ तरुणांना पकडून त्यांच्या पालकांना पोलिसांनी बोलावले. तसेच गणेशोत्सवाच्या काळात दुचाकीस्वार सोनसाखळी चो-या करतात, त्यासाठी दुचाकींविरोधातही पोलिस विशेष मोहिम राबवणार आहेत.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात विनयभंग व बलात्काराचे एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर गणेशोत्सवापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. त्यातील अनेकांना प्रतिबंधात्मक स्वरुपात अटकही करण्यात येणार आहे. पण लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, दोन कुटुंबियातील वादातून झालेल्या हाणामारीत विनयभंग यासारख्या आरोपींचा या प्रतिबंधात्मक कारवाईत समावेश नसल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले.

मंडप परिसरात पत्ते खेळण्यास बंदी

गणेशोत्सव मंडळांशी मुंबई पोलिसांनी चर्चा केली असून मंडप व परिसरात पत्ते खेळण्यास सक्त मनाई केली आहे.  भक्तांशी सौजन्याने वागून गणेशोत्सवाच्या काळात मंडप परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. याशिवाय महिला व पुरुषांची रांग वेगळी ठेवण्याची सूचनाही केली आहे.

1 COMMENT

  1. होळी, गणेशोत्सव, नवरात्र असे सण म्हटले की गरिबातिल गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीसुद्धा सण सोहळा बघन्याकरिता घराच्या बाहेर पडतात. कशावरुन पुरूषवर्ग महिला भाविकांसोबत गैरव्यवहार करतात, जर एखादी महिला गर्दिमध्ये स्वतःहून त्या सभ्य पुरुषाच्या अंगावर आदळली तर त्यात त्याचा दोष तरी काय ? अशा वेळेस त्या महिलेने शक्यतो घराबाहेर पडूच नये म्हणजे या ना त्या कारणाने उगीच मुंबई पोलिसाना तरी त्रास तरी कशाला द्यावा ? याचा अर्थ असा होतो की जर अशा महिला असल्यास पोलीस त्याना मदत करतील अशाने एके दिवशी पुरूष वर्गास घरातून बाहेर निघणे देखील मुश्कील होईल. म्हणून जर सत्य असेल तरच तक्रार तेथील पोलिसानि घ्यावी, म्हणजे बिचारा गरीब पुरूष त्यात अडकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version