Home Uncategorized चायनीज रंगांनी लघुउद्योग ‘बेरंग’

चायनीज रंगांनी लघुउद्योग ‘बेरंग’

1

स्वस्त आणि मस्त मिळणा-या चिनी वस्तूंनी देशांतर्गत उद्योगांना संकटाच्या खाईत लोटले आहे.

नवी दिल्ली- स्वस्त आणि मस्त मिळणा-या चिनी वस्तूंनी देशांतर्गत उद्योगांना संकटाच्या खाईत लोटले आहे. रंगांचा सण असलेल्या होळीची बाजारपेठही चिनी कंपन्यांच्या स्वस्तातील रंग, पिचका-यांनी काबीज केली आहे. यामुळे देशातील लघुउद्योगांना या कंपन्यांची स्पर्धा जीवघेणी ठरत असून गेल्या तीन वर्षात या क्षेत्रातील किमान १००० लहान-मोठे उद्योग बंद पडले आहेत. यामुळे १० लाख कामगारांवर बेकारी कु-हाड कोसळली आहे.

औद्योगिक संघटना असोचेमने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वाढत्या स्पर्धेमुळे गेल्या तीन ते पाच वर्षात या क्षेत्रातील १००० कंपन्यांना टाळे लागले आहे. यामुळे यामधील आठ ते १० लाखांहून अधिक लोकांचा रोजगार हिरावला गेला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आज बाजारपेठेत चिनी वस्तूंचा हिस्सा वाढला आहे. चिनी उत्पादनांचे अनेक पर्याय उपलब्ध असून ते भारतीय उत्पादनांच्या तुलनेने स्वस्त असल्याचे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले. 

होळीच्या सणात रंग उत्पादकांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या अलाहाबाद, मथुरा, वृंदावन, लखनऊ, पटना या ठिकाणी असोचेमने गेल्या महिन्यात सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांची सध्याची स्थिती आणि चिनी रंगांचे बाजारातील वाढती मागणी याकडे असोचेमने लक्ष वेधले आहे. स्थानिक रंग उत्पादकांचे हित जपण्यासाठी चिनी रंगांच्या आयातीवर बंदी आणली पाहिजे, असे रावत यांनी सांगितले. गेल्या वर्षी होळीच्या सणामध्ये चिनी आणि भारतीय पिचका-यांचे विक्रीचे प्रमाण ८०:२० टक्के होते. तर यंदा हे प्रमाण ९५:५ टक्के झाले आहे. चिनी पिचका-यांमध्ये नावीन्यता असल्याने त्यांच्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा असल्याचे असोचेमने म्हटले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version