Home टॉप स्टोरी चैत्यभूमीकडे रीघ सुरू

चैत्यभूमीकडे रीघ सुरू

1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर उसळणार असल्याने महापालिकेकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

मुंबई- स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या त्रिसूत्रीद्वारे तमाम भारतीयांना लोकशाही व्यवस्था प्रदान करणारे महामानव, प्रज्ञासूर्य तथा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या खेडय़ा-पाडय़ांतून आलेल्या गरीब जनतेची पावले दादर, चैत्यभूमीकडे पडू लागली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर उसळणार असल्याने मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात महापालिकेकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यावर्षी शनिवार-रविवार सुट्टीचे दोन दिवस लागून आल्याने चार दिवस आधीच ३ डिसेंबरपासून मोठय़ा संख्यने भीमानुयायांनी चैत्यभूमीकडे रीघ लावण्यास सुरुवात केली आहे.

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर माथा टेकवल्याने जगण्याची नवी प्रेरणा मिळते, अशी भावना भीमानुयायांची आहे. त्यामुळे थंडी-वा-याची तमा न बाळगता दरवर्षी महाराष्ट्र व देशाच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकरी अनुयायी कुटुंबकबिल्यासह निर्वाणस्थळ असलेल्या चैत्यभूमीकडे येतात. गेल्या वर्षी चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली होती. या वर्षी इंदू मिलच्या जागेवर भीमस्मारक कधी उभे राहणार? दादरमधील आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू असलेले ‘आंबेडकर भवन’ एका रात्रीत जमीनदोस्त करणा-यांचे काय झाले? असे अनेक प्रश्न घेऊन भीमानुयायांचे जत्थे चैत्यभूमीकडे येणार आहेत.

1 COMMENT

  1. यावर्षी शनिवार-रविवार सुट्टीचे दोन दिवस लागून आल्याने चार दिवस आधीच ३ डिसेंबरपासून मोठय़ा संख्यने भीमानुयायांनी चैत्यभूमीकडे रीघ लावण्यास सुरुवात केली आहे.

    चुकीचे दिवस लिहिले आहेत हे . यावर्षी सोमवार मंगळवार आहे कृपया हे लक्षात घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version